मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने  500 झाडे लावून पर्यावरण दिन साजरा

महावार्ता न्यूज: मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने  500 झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. 
मुळशीतील बॉबस्ट इंडिया कंपनीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुळशी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या समावेत हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पोलुशन कंट्रोल बोर्ड चे सदस्य – श्री नितीन गोरे साहेब, सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्डचे रिजनल डायरेक्टर – श्री प्रतीक भरमे, सायंटिस्ट- श्री शशिकांत लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चे उप प्रादेशिक अधिकारी – श्री वि वि किल्लेदार, शवश्री प्रशांत गायकवाड, श्री मंचक जाधव, तसेच फिल्ड ऑफिसर – श्री संदीप मोठेगावकर, श्री राहुल निंबाळकर, श्री प्रमोद डोके उपस्थित होते.
मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने मुळशी तालुक्यातील बॉबस्ट इंडिया प्रा. लि., ब्रिंटन्स कार्पेट एशिया प्रा. लि., मुबीया सस्पेशन इंडिया प्रा. लि., कैसर कॉम्प्रेसर इंडिया प्रा. लि., रॅडॅक फास्टनर्स इंडिया प्रा. लि., एक्वेरियस इंजिनियर्स प्रा. लि. इत्यादी कंपन्या उपस्थित होत्या.
 बॉबस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिट कंपनीमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुळशी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने  500 झाडे लावण्यात आली. जागतिक पर्यावरणाचे उद्दिष्ट सांगताना आपल्यासमोर उभ्या असलेल्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करताना यामध्ये जमीन पुनर्संचन, वाळवंटीकरण व दुष्काळ या आपल्या समोरील अहवालांवरती मार्गदर्शन दिले  प्रमुख उपस्थित श्री नितीन गोरे साहेब यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व सदस्यांना कापडी पिशव्यांचे वाटप केले व प्लास्टिक पिशव्या वस्तू इत्यादी चा वापर टाळण्याबाबत उपदेश केला.
जागतिक पर्यावरण दिन या कार्यक्रमाची प्रस्तावना मुळशी इंडस्ट्रीज असोसिएशनचे सेक्रेटरी श्री रमण गोवित्रीकरण यांनी केली , उपस्थित  मान्यवरांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष  सतीश करंजकर व खजिनदार  तानाजी काळे यांनी केले तसेच तेथे उपस्थित असलेले मान्यवर व इतर सर्व कंपन्यातील सहकारी यांचे आभार श्री लक्ष्मण जोशी व सौ. सीमा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.
See also  आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या आदर्श मंडळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ यंदा थेट मंत्रालयात