पेरिविंकलचा विराज “आम्ही जरांगे” या चित्रपटात झळकणार, छोट्या मनोज जरांगेंच्या भूमिकेत विराज

महावार्ता न्यूज ः “आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणीच्या भूमिकेत पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पौड मधील विराज लटके हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी याने मनोज जरांगे यांची बालपणीची भूमिका साकारली आहे. पेरिविंकलचे अध्यक्ष राजेंद्र बांदलांकडून विराजचे कौतुक करण्यात आले आहे
योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित “आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
पेरिविंकल स्कूल ही विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षणासाठीच नाही तर त्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देते. या प्रोत्साहनामुळेच विराज लटके हा विद्यार्थी आज या स्तरावर पोहोचला व शाळेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले. यावेळी बोलताना शाळेचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांनी विराज लटके याचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहण्याचे आवाहन केले.

या चित्रपटामध्ये माढा तालुक्यातील केवड येथील सध्या पौड तालुका मुळशी येथील विराज गणेश लटके हा इयत्ता सातवी मध्ये पेरिविंकल इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणी ची भूमिका साकारली आहे. पौड येथून प्रथमच एक बालकलाकार चित्रपटात दिसणार आहे यापूर्वीही विराज लटके यांनी वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवलेले आहे. त्याच्या तील हे कौशल्य विकसित करण्यासाठी पेरिविंकल स्कूल मधील शिक्षकवृंद व पालक यांचेही योगदान मोलाचे ठरते. त्याची ही भूमिका पाहण्याची प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे.

या चित्रपटामध्ये मराठ्यांच्या एकजुटीची मशाल हाती घेऊन निघालेल्या गरजवंत मराठ्यांच्या संघर्षाची कहाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारायणा प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे शूटिंग पुणे ,परभणी ,बीड ,जालना या परिसरातील ग्रामीण भागात झालेले आहे. या चित्रपटांमध्ये प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत मकरंद देशपांडे, सुबोध भावे ,प्रसाद ओक, अजय पुरकर विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत ,अमृता धोंगडे ,अंजली जोगळेकर ,आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे, पृथ्वीराज थोरात आदि कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. विराज लटके याने चित्रपटसृष्टीत पदार्पण करून पेरिविंकल स्कूलचा झेंडा अभिमानाने रोवला व त्याच्या अभिनयाने सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला.
See also  मुळशीतील पूर्व पट्टयात संग्राम थोपटेंच्या प्रचारात उसळली गर्दी , माण, हिंजवडी, मारूंजीतही महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा