हिंजवडीत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, सरपंच गणेश जांभुळकरांच्या विकास कामांचा झंझावात सुरू

महावार्ता न्यूज: हिंजवडीत श्री.म्हातोबा मंदिर टेकडी परिसरात जलजीवन मिशन टप्पा क्र.२ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 4 टाक्यांचे भूमिपूजन हिंजवडीचे प्रथम नागरिक सरपंच गणेश जांभुळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
जलजीवन मिशन टप्पा क्र.२ अंतर्गत पाण्याच्या टाक्या १५ लक्ष लि क्षमतेच्या २ टाक्या,७.५० व ८.५० लक्ष लि १ टाकी, एकूण 4 टाक्यांचे कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी वसंत साखरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते दिलीप हुलावळे, मा. उपसरपंच तानाजी हुलावळे , सामजिक कार्यकर्ते हिरामण साखरे,उपसरपंच. सौ. दिपाली जांभुळकर, ग्रामसेवक सोमा खैरे,मा.सरपंच विक्रम साखरे, मा.सरपंच विशाल साखरे,मा.सरपंच श्री.मच्छिंद्र हुलावळे, मा. सरपंच .सचिन जांभुळकर, मा.सरपंच.श्री प्रदीप वाघमारे,मा.उपसरपंच सौ.मनीषाताई हुलावळे, मा.उपसरपंच रेखाताई साखरे, मा .उपसरपंच पल्लवीताई गंगावणे, मा.उपसरपंच ऐश्वर्याताई वाघमारे , हरीषचंद्र जांभुळकर, संतोष साखरे, प्रशांत वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
See also  भोर, वेल्हा, मुळशीतील पैलवानांचा शंकर मांडेकर यांना पाठिंबा