पेरिविंकलच्या  नव्या शाळेचे उत्साहात भूमिपूजन, पेरीविंकलची विश्वविद्यालयाच्या दिशेने झेप-  पंकज महाराज गावडे

महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल ग्रुप ऑफ इइन्स्टिटयूट्समचा हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्ताचे औचित्य साधून घोटावडे फाटा येथे नवीन शाळेचे वास्तूत भूमिपूजन व पायाभरणी समारंभ ह. भ. प पंकज महाराज गावडे यांच्या उपस्थितीत  उत्साहात  संपन्न झाला. पेरिविंकल च्या बावधन, सुस, पिरंगुट, पौड, माले, कोळवण अशा 6 शाखांच्या यशस्वी विस्तारा नंतर घोटावडे येथील 7 व्या शाखेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करून विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल सिद्ध केली.

कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भाषाप्रभू व अध्यात्मिक गुरु ह. भ. प. मा. श्री पंकज महाराज गावडे यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी मायात गावडे, उद्योगपती अजित करंदीकर,आश्विनी करंदीकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  राजेंद्र बांदल, सौ रेखा बांदल यांच्या समवेत सर्व शाखांचे प्राचार्य तसेच गटनेते शांताराम इंगवले, संदीप ढमढेरे, यश बांदल, ज्ञानेश्वर पवळे, उद्योगपती सुधांशू शर्मा, वरिष्ठ पोलीस अधिकारी छबुराव बेरड, संजय पन्हाळकर, सौ स्नेहा साठे, आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळशी तालुक्यात पेरिविंकल शाळेच्या शाखा बावधन, सूस, पिरंगुट, पौड, कोळवण, माले व आता घोटावडे येथे नवीन शाखेचा शुभारंभ करून पेरिविंकल ची जणू सप्तपदीच पूर्ण झाली आहे . लवकरच या पेरिविंकल रुपी वटवृक्षाचे मोठ्या विद्यापीठा मध्ये रुपांतर होईल अशी जिद्द प्रत्येकाच्या मनात आहे.

अयोध्या येथील रामलल्ला च्या गर्भगृहात प्रथम कीर्तन करण्याचा मान पटकवणारे कीर्तनकार, अध्यात्मिक गुरु, भाषाप्रभू ह.भ. प. श्री.पंकज महाराज गावडे यांच्या कीर्तनाने घोटावडे येथील भूमी पावन झाली .यावेळी महाराजांनी आपल्या कीर्तनातून जनजागृती केली व शिक्षकांनी मुलांना जगणं शिकवावं तसेच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करावा. केवळ सिलॅब्स शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर एक आदर्श नागरिक घडवणारा खरा शिक्षक. शिक्षक हा नेहमीच श्रेष्ठ असून अणूपासून ब्रम्हांडा एवढी प्रगती करताना शिक्षकांनी पदचिन्हे उमटवावी असे मत पंकज महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षकांना अर्जुनाची उपमा देऊन शिक्षकांना प्रोत्साहित केले .सर्वांनी जीवनाच्या या शाळेत श्रीकृष्ण होऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा संदेश पंकज महाराज गावडे यांनी सर्वांना दिला.

हनुमानाप्रमाणे उड्डाण घेत पेरीविंकलने सातव्या शाखेत यशस्वीपणे पदार्पण केलं आहे. स्पर्धेच्या या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण प्रक्रियेतील नवीन बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे या समर्पण भावनेने शैक्षणिक रोपट्याचा वृटवृक्ष फुलवण्यात व शून्यातून विश्व निर्माण करण्याचे श्रेय हे सतत अहोरात्र कार्यरत असणाऱ्या प्रचार्यापासून ते काका मावशीपर्यंत सर्वांना जाते व संस्थेतील प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे असे संस्थेचे अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. 2012 पासून सुरुवात झालेल्या या शैक्षणिक वृक्षाचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे. वीस मुलांपासून चालू झालेला हा प्रवास आता तब्बल 7500 विद्यार्थी व 500 हुन अधिक शिक्षकवृंद या घरात पोहोचला आहे. गुणवत्तेच्या बाबतीत पेरिविंकल स्कूल आजही नामांकित आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व शाळेतील प्रत्येक शिक्षक अहोरात्र प्रयत्नशील असतात व राहतील याची खात्री बाळगतो असे प्रतिपादन करून आलेल्या सर्व मान्यवारांचे व शिक्षकवृंद तसेच उपस्थित्यांचे आभार मानून घोटावडे च्या पावन भूमिला पवन वेगाने गती घेऊन युनिव्हरसिटी कडे वाटचाल असल्याचे सांगितले.
या शुभप्रसंगी पेरिविंकल ग्रुपच्या सर्व मुख्याध्यापकांनी मा.श्री.बांदल सर व सौ रेखा मॅडम यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त केला .
घोटावडे येथे भूमिपूजन व पराभरणी समारंभाच्या निमित्ताने 500 स्टाफ व सर्व उपस्थितांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
आज शिवाजी महाराज पुण्यतिथी स्मरणात ठेवून कार्यक्रमाची सांगता शिवाजी महाराज व भारत मातेच्या गजराने करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजीत टकले यांच्या मार्गदर्शनाने पूनम पांढरे व सना इनामदार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील यांनी केले.
See also  हिंजवडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा जय गणेशचा नारा, दुसर्‍यांदा सरपंचपदी गणेश जांभूळकरांची वर्णी