अजीत पवारांच्या टिकेला थोपटेंचे तोडीस तोड उत्तर, लोकसभेनंतर आता विधानसभेतही मतदार पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही – संग्राम थोपटे

महावार्ता न्यूज: भोर-रायगड-मुळशी विधानसभेचा संघर्ष आता उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीतील प्रचार सभेत विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर टीकास्त्र सोडले, तोच आमदार थोपटे यांनी तोडीस तोड उत्तर समाजमाध्यमावर दिले आहे.

महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशीत जाहीर सभा झाली. यावेळी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची मिमिक्री करून आमदाराच्या अंगात पाणी असावे लागते असे विधान केले.
भोरचे एस टी स्टँड आहे की पिकअप शेड ? माझ्या बारामतीत येऊन पहा असे सांगून अजीत पवार यांनी संग्राम थोपटेंची मिमिक्री केली.

यावर आमदार संग्राम थोपटे यांनी सोशल मिडियावर पुढील उत्तर दिले आहे..
जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असुन माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी नाही अशी टीका टिप्पणी केली.
परंतु त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे हे आपणाला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवले आहे आणि येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि या मतदारसंघातील जनता तुम्हाला चांगल्या पध्दतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही!
– संग्राम थोपटे
-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
See also  शाब्बास..पेरीविंकलचा दहावीतही 100% निकालाचा डंका कायम