महावार्ता न्यूज: भोर विधानसभा मतदार संघात अखेर 23 पैकी 6 निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. हॅट्ट्रिक आमदार संग्राम थोपटे विरूध्द शिवसेनचे बंडखोर कुलदीप कोंडे, राष्ट्रवादी पवार गटाचे शंकर मांडेकर आणि भाजपाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे अशी चौरंगी कुस्ती रंगणार आहे.
भोर व मुळशी तालुक्यातील २३ उमेदवारांनीअर्ज भरले होते. त्यातील ८ उमेदवारांचे अर्ज हे छाननीत बाद करण्यात आले होते. त्यांनतर १५ उमेदवार हे वैद्य ठरले होते. उमेदवारी अर्ज भरलेल्या ९ उमेदवारांनी माघार घेतली असून अंतिम ६ उमेदवार भोर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामधील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह खालील प्रमाणे
नाव – पक्ष – चिन्ह
१) संग्राम थोपटे – काँग्रेस – हाताचा पंजा २) शंकर मांडेकर- राष्ट्रवादी कॉँग्रेस – घड्याळ ३) अनिल जगताप – सैनिक समाज पार्टी – ४) लक्ष्मण कुंभार – दलित शोषित पिछडावर्ग अधिकार दल – ५) कुलदीप कोंडे – अपक्ष – रिक्षा ६) किरण दगडे पाटील – अपक्ष – चहाची किटली
माघार घेतलेल्या ९ उमेदवारांमध्ये पियुषा किरण दगडे(ता.मुळशी), प्रमोद पंडित बलकवडे(ता.मुळशी), बाळासाहेब रामदास चांदेरे (ता.मुळशी), भाऊ पांडुरंग मरगळे(ता.मुळशी), राहुल चांगदेव पवार(ता.भोर), सचिन सदाशिव देशमुख(ता.भोर), समीर विठठल पायगुडे(ता.मुळशी), सुर्यकांत राजाराम माने(ता.भोर) यांचा समावेश आहे.
बंडखोरीचा सर्वाधिक फायदा हा काॅग्रेस होणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.