


महावार्ता न्यूज: ( संपादक- संजय दुधाणे) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी -एनडीएतील दुधानवाडीतील काळूबाई मंदिरातील मार्गशिर्ष महिन्यातील उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच काळूबाई देवीचे दर्शन घेत मंदिर परिसराला भेट दिली.
दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी एनडीएतील दुधानवाडीतील काळूबाई मंदिरात देवीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा या उत्सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी देवीचा अभिषेक, होमहवन, देवीच्या मंदिराबाहेरील मारूती, गणेश व रामजी दुधाणे यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. उत्तमनगर, शिवणे, वारजे, माळवाडी, धावडे, अहिरे व मुळशी तालुक्यातील देवीभक्तांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. महाप्रसादाचाही शेकडो भक्तांना आस्वाद घेतला.















