महावार्ता न्यूज ः झोपताना व सकाळी उठल्यावर मनाला सकारात्मक ऊर्जा दिली तर आनंददायी, शांतीपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र ब्रम्हकुमारीज्चे राजयोगी सूरज भाई यांनी धनकवडीतील कार्यक्रमात दिला. सूरज भाईंच्या सकारात्मक विचार मंथनातून पुणेकर मंत्रमुग्ध झाल्याचा अनुभव उपस्थितींनी घेतला.
ब्रम्हकुमारीज्च्या धनकवडी शाखेने सकारात्मक बदलाची बलशक्ती या विषयावर संस्थेच्या विश्व परिवर्तन भवनच्या सभागृहात माऊंट आबू ब्रम्हकुमारीज्चे राजयोंगी सूरज भाई यांचे आध्यात्मिक व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी राजयोगिनी गीता दीदी, ऊषा दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळशीचा पाणी देत कार्यक्रमाचे अनोेखे उद्घाटन झाल्यानंतर नेल्सन मंडेला पुरस्कार विजेते सूरज भाई यांनी आपल्या सकारात्मक वाणीने उपस्थितांची मने जिंकली. क्षणभराच्या काम, क्रोधामुळे जीवनाचे कसे नुकसान होते हे विशाखापट्टणम जेलमधील कैदयाचे अनुभव सांगत सूरजभाई पुढे म्हणाले की, शांतपूर्ण जीवशैलीसाठी उठल्यानंतर थोडा वेळ सकारात्मक विचारांचे राजयोग ध्यान केलेच पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर सुप्त मनाला मी शक्तीशाली आत्मा आहे, मी निरोगी आहे, आंनदी आहे, शांतीचा सागर आहे या सूचना दिल्या तर जीवन आनंददायी कसे होते यांचा मंत्र सूरज भाईंनी सोप्या भाषेत कृतीसह समजवून सांगितला.
राजयोगिनी गीता दीदी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. सकारात्मक विचारांमुळे दोन आठवड्यात जीवन सुखमय कसे होते यांचे अनुभव गीता दीदी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी के सुलभा दीदीने केले तर बी के डॉ. आरती यांनी सूत्रसंचालन केले.