मुळशीत लायन्स क्लब लोणावळाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महावार्ता न्यूज ःपितृ पंधरवड्यानिमित्त  मुळशीतील  नांदगाव, देवघर गावात  लायन्स क्लब लोणावळा खंडाळावतीने संपर्क बाल आशा घर बालग्राम मधील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

संस्थेतील मुलांसाठी ला. नंदकिशोरजी खंडेलवाल (राजाजी) यांच्यावतीने किराणा साहित्य, डॉ. सुहास गोसावी मनशक्ती केंद्र लोणावळा तसेच लायन डॉ. पी एम ओसवाल यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली. टोनी लँड शॉप चेंबूर यांच्यावतीने संपर्क बाल आशा घर येथील मुलांसाठी तसेच संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे येथील मुलींसाठी कपडे, अनिल भिलारे यांच्या वतीने संस्थेतील मुलांसाठी ब्लॅंकेट इत्यादी साहित्य भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मावळ वार्ता फाउंडेशन चे अध्यक्ष माननीय श्री. नंदकुमार वाळंज (बाबूजी), माझी आदर्श सरपंच माननीय सौ वत्सलाताई वाळंज, लायन अॅडवोकेट प्रफुल लुंकड अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, आयन लायन देवेंद्र नालेकर माजी अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन विरल गाला सचिव लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन डॉ दिलीप सुराणा, लायन डॉ पोपट ओसवाल, लायन प्रकाश जैन खजिनदार लायन्स क्लब लोणावळा खंडाळा, लायन्स क्लब लोणावळा खंडाळाचे सदस्य मंगेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते

तसेच या कार्यक्रमाला मा. प्रकाश ढंभीरे, मा. श्री. बी. एस. राजपूत सर, मा. श्री. उत्तम रॉय, मा. श्री. दिनेश बॅनर्जी, मा. सौ सविता शिंदे मॅडम, मा. श्री. स्वतंत्र कुमार ओसवाल, मा. श्री. शशिकांतजी खंडेलवाल सदर सदर कार्यक्रमासाठी लायन नंदकिशोरजी खंडेलवाल (राजाजी) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, सामाजिक कार्यकर्ते श्री, अमर लोखंडे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

See also  ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून ऑलिम्पिक पदकाचे पूजन, खेळाडूंना मार्गदर्शन