महावार्ता न्यूज: ऐन गणेशोत्सवात हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा जय गणेशचा नारा घुमला. राज्यातील शिंदे शासनाच्या गुवाहाटी स्टाईलने सरपंचपदी गणेश जांभुळकरांची निवड होताच त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत गणेश जांभूळकर यांची दुसऱ्यांदा 9 विरुद्ध 7 आशा मताधिक्याने ” सरपंच’पदी निवड झाली . 17 पैकी एक सदस्य गैरहजर राहिल्याने दुपारी दीड वाजता उपस्थित 16 सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये गणेश जांभुळकर यांना 9 मते तर मयूर साखरे यांना 7 मते मिळाली. यावेळी सचिव म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी बी आर पाटील व तलाठी सागर शेलार यांनी काम पाहिले.
पंचवार्षिक निवडणुकीत दुसर्यांदा सरपंचपदावर विराजमान झाल्यानंतर दिलीप हुलावळे, वसंत साखरे,मा. उपसरपंच तानाजीनाना हुलावळे, हिरामण साखरे, गणेश बोरकर, सूरज जांभूळकर, दत्तामामा वाकळे, बाळासाहेब पिंजन, उमेश साखरे, प्रवीण जांभूळकर,यशवंत साखरे, कुंडलिक जांभुळकर, निलेश जाधव यांनी पुष्पहार परिधान करीत नवनिर्वाचित सरपंचांचा गौरव केला.
निवडणुकीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंजवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.