महावार्ता न्यूज ः मुळशीतील भुगावमधील राष्ट्रीय खेळाडू आयुषा प्रमोद इंगवलेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करीत राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत आयुषाने सांघिक कांस्यपदक जिंकले. ओरीसा संघाला 2-0 तर आंध्रपदेशला 2-1 सेटने पराभूत करून आयुषाने महाराष्ट्रासाठी कांस्य पदक पटकावले आहे. यपूर्वी गुतरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही आयुषाने पदकाची बाजी मारली होती. पुढील महिल्यात गोवा येथे होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही ती महाराष्ट्राचे प्रतिनिशित्व करणार आहे. राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सलग पाचव्यांदा पदक जिंकण्याचा पराक्रम करणारी आयुषा ही महाराष्ट्रातील एकमेव महिला आहे. आयुषा एस. पी कॉलेजमध्ये 12 वीत शिकत असून विल्सप अॅड्रीव यांचे मिला मार्गदर्शन मिळत आहे.