


राष्ट्रीय मतदार दिन पुण्यात साजरा
पुणे : लोकशाही ही केवळ राज्यघटनेतील संकल्पना नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणातून जिवंत राहते. मतदानाचा अधिकार हा केवळ हक्क नसून तो प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. युवकांनी विशेषतः मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, लोकशाही मूल्यांची जपणूक करावी आणि संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याची जबाबदारीने कदर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी केले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, प्रमुख पाहुणे मेजर अर्चिस सबनीस, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी – २०२६’ हा पुरस्कार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील श्रीमती अर्चना यादव-पोळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील श्री. सुनील शेळके यांचा सन्मान करण्यात आला. निवडणूक नायब तहसीलदार प्रवर्गात आंबेगाव येथील श्री. सचिन वाघ आणि शिवाजीनगर येथील श्रीमती सायली धस यांना पुरस्कार देण्यात आला, तर निवडणूक लिपीक प्रवर्गात शिवाजीनगर येथील श्रीमती अर्चना सानप यांना गौरविण्यात आले.

मतदारसंघनिहाय उत्कृष्ट पर्यवेक्षक पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये जुन्नर येथील श्री. राजेंद्र अडसरे, आंबेगावचे श्री. सागर सूर्यकांत गुरव, खेडचे श्री. अनिल बोऱ्हाडे, शिरूरचे श्री. एकनाथ देवीचंद ओव्हाळ, इंदापूरचे श्री. लक्ष्मीकांत शिवाजी मुळे, बारामतीचे श्री. संतोष रामचंद्र नलवडे, पुरंदरच्या श्रीमती अरूणा दत्तात्रय खेडेकर, भोरचे श्री. युनूस अब्दुल शेख, भोर-मुळशीचे श्री. लवा बाबा गायकवाड, मावळच्या सौ. एम. एफ. खान, चिंचवडचे श्री. महेंद्र ज्ञानोबा पवार, पिंपरीचे श्री. राजेंद्र रामचंद्र कांगुडे, भोसरीच्या श्रीमती मंगल जाधव, वडगावशेरीच्या श्रीमती सोनल मंगेश बोऱ्हाडे, शिवाजीनगरच्या श्रीमती लता दामसे, कोथरुडचे श्री. दीपक कंधारे, खडकवासल्याचे श्री. रवी फनसे, पर्वतीच्या श्रीमती स्नेहल श्याम साखरे, हडपसरचे श्री. अजय सिन्नरकर, पुणे कॅन्टोन्मेंटचे डॉ. मोहम्मद जमीर अहमद चाँद शेख आणि कसबा पेठ मतदारसंघातील श्री. सौरभ मोरे यांचा समावेश होता.
याशिवाय उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जुन्नरचे श्री. कैलास दाभाडे, आंबेगावचे श्री. अर्जुन रामचंद्र झोडगे, खेडचे श्री. दिनेश धाकडे, शिरूरचे श्री. सचिन दिलीप कारकुड, दौंडचे श्री. सुधीर पोपट बोत्रे, इंदापूरचे श्री. मुरलीधर धनंजय माने, बारामतीचे श्री. विजय तुकाराम चव्हाण, पुरंदरचे श्री. आदिनाथ भागवत, भोरचे श्री. सूर्यकांत काशिनाथ बारवकर, भोर-मुळशीचे श्री. मयुर बाळासाहेब कळमकर, मावळचे श्री. महादेव शेलार, चिंचवडचे श्री. अनिल नारायण सुकाळे, पिंपरीचे श्री. सुधीर मारुती खाडे, भोसरीच्या श्रीमती रजनी दळवी, वडगावशेरीचे श्री. रविंद्र देवराम गारे, शिवाजीनगरचे श्री. रामदास गवारी, कोथरुडचे श्री. धर्मराज आंग्रे, खडकवासल्याचे श्री. गणेश कारले, पर्वतीच्या श्रीमती अर्चना प्रशांत मोरे, हडपसरच्या श्रीमती रेश्मा ढमढेरे, पुणे कॅन्टोन्मेंटच्या श्रीमती बिंदू नायर आणि कसबा पेठच्या श्रीमती चित्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला.













