हिंजवडीमध्ये मतदार जनजागृती अभियानास मोठा  प्रतिसाद, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा – सोमा खैरे

मुळशी (हिंजवडी): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय पुणे यांच्या आदेशानुसार सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात हिंजवडी, ता. मुळशी येथील जास्तीत जास्त द्र मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी  मतदार जनजागृती साठी विविध उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमांत विद्यार्थी, महिला आणि नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पथनाट्य, मतदार शपथ, मतदान जागृती रॅली, मतदानाचा संकल्प स्वाक्षरी मोहीम, विदयार्थी सुसंवाद, बी.एल. ओ. सुसंवाद, कोपरा सभा, प्रत्यक्ष मतदार भेटी व जनजागृती, गृहभेटी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

मा. सुजाता देशमाने गटशिक्षणाधिकारी मुळशी तथा स्वीप नोडल अधिकारी मुळशी यांनी प्रत्येक कार्यक्रमांत सक्रीय सहभाग घेऊन मौलिक मार्गदर्शन केले, नागरीकांशी सुसंवाद साधला. सोबत श्री. ठकोरे सोपान केंद्रप्रमुख तथा सहाय्यक नोडल अधिकारी मुळशी यांनी हिंजवडीमधील प्रत्येक मतदान केंद्राची टक्केवारी वाढेल असे प्रयत्न प्रत्येकाने करावे असे आवाहन केले. तसेच दि. ८ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोहेंबर २०२४ या कालावधीत घ्यावयाचे विविध स्वीप कार्यक्रमांचे नियोजन केले व तशा सविस्तर सूचना केल्या आहेत.

हिंजवडी ग्रामपंचायत अधिकारी श्री.सोमा खैरे यांनीही प्रत्येक मतदारास मतदान करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमांमध्ये सर्व बी. एल. ओ. शिक्षक मुख्याध्यापक, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. शोभा कळमकर यांनी केले व श्री. अनिल साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
See also  पेरीविंकलच्या विज्ञान नगरीत घडतील अनेक भावी शास्त्रज्ञ!!!