सुवर्णकन्या आयुषा इंगवलेची राष्ट्रीय स्पर्धेत निवड, राज्य स्पर्धेत 3 पदकांची लयलूट

महावार्ता न्यूज:  सांगलीत झालेल्या 12 व्या सॉफ्ट टेनिस राज्य स्तरीय स्पर्धा मुळशीची सुवर्णकन्या आयुषा प्रमोद इंगवलेने दुहेरीत सुवर्ण , एकेरीत व संघिक स्पर्धेत कांस्य पदकांची लयलूट केली. या यशाने पंजाबमधील राष्टीय स्पर्धेत आयुषाची निवड झाली आहे.
सलग 6 वेळा राज्य स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आयुषाने नोंदवून मुळशीची शान देशात उंचावली आहे. धाराशिव, लातूर, यजमान सांगली व संभाजी नगरच्या संघावर मात करून आयुषाने राज्य स्पर्धा गाजविली .

आयुषा ही सर परशुराम महाविद्यालयात 12 वित शिकत असून तिला विल्सन अंड्रीव व दयानेश्वर पाडळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे
See also  विजयासह भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल, थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात