लोकसभा निवडणूकीसाठी मुळशी सज्ज, पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण

महावार्ता न्यूज: बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज मतदारसंघनिहाय पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.
मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली येथून मतदान केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता एकूण ९० एसटी बसेस, ८ मिनीबस व ६५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. २८१ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. निवडणुकीकरीता एकूण ४ हजार ६२ मनुष्यबळ कार्यरत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी नियोजनाप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. मतदान पथकाला साहित्याचे वितरण करण्यात आलेले असून बसेस, जीपद्वारे आज सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत पोहोचतील. पोलीस बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदीच्या अनुषंगानेही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या ७ मे रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून पात्र मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले आहे.
See also  रामजन्मभूमीतील सर्वप्रथम किर्तनाचे मानकरी पंकज महाराजांचा राजेंद्र बांदल परिवाराकडून गौरव