ब्रह्माकुमारीज् वतीने मुळशीत उद्या कृषी मेळावा

महावार्ता न्यूज: ग्राम विकास प्रभाग ब्रह्माकुमारीज तर्फे मुळशीतील दारवलीमधील हृदयमोहिनी वन येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुद्ध, सात्विक व विषमुक्त अन्न मिळावे, शेती आणि त्याला जोडलेला सर्व समाज, गांव सुखी व्हावा या उद्देशाने 25 ऑक्टोबर, 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शाश्वत योगीक शेती, जैविक शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यां सर्वांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बी के राजू भाईजी व माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.
स्थान : हृदयमोहिनी वन, धनवेवाडी, पिरंगुट-पौड, दारवली, ता मुळशी, पुणे.
वेळ : संध्याकाळी 5.00 ते 8.00
See also  पेरीविंकलचा कलाविष्काराने गाजले स्नेहसम्मेलन,बालगोपालांच्या सूत्रसंचालनाने जिंकली मने