पेरीविंकल पुन्हा शंभर नंबरी सोने, 12 वीत 100% निकालाची परंपरा कायम

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील 2 वर्षाप्रमाणेच 100% निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस् कॉमर्स व सायन्स या तिन्ही क्षेत्रात बाजी मारली आहे.

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुस येथून एकूण 53 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून शास्त्र शाखेतून चंचल शर्मा हीने 86% गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर अनुज शुक्ला याने 68%गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला असून नितेश सिंग याने 67% गुण मिळवून तृतीय स्थान पटकवले आहे तर कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेत जयश्री सद हीने 80% गुण मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले. तर मोंटू परमार याने द्वितीय स्थान मिळवत आकाश पाटील याने तृतीय स्थान पटकवत बाजी मारली तसेच कला शाखेतून सचिन दिंडे याने 83% गुण मिळवत प्रथम स्थानावर आपले नाव कोरले.

सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण होत महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा व त्यांना तशीच सार्थ साथ देणारे सर्वच विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या परिश्रमाचे चीज म्हणजेच आजचा 100% निकाल.
या सगळ्याला कायम पाठिंबा असणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर , तसेच संचालिका सौ रेखा बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, पेरिविंकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य निर्मल पंडित , डॉ अभिजित टकले, प्रिया लड्डा व स्वाती कोल्हे यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व तसेच HOD सचिन खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इन्चार्जेस कल्याणी शेळके, पूनम पांढरे, नेहा माळवदे व इंदुमती पाटील या सर्वांची जिद्द व चिकाटी यांचा मिलाप व सहकार्य आणि उच्च विद्या विभूषित आणि अनुभवी शिक्षकवृंद , तसेच या सर्व वातावरणात आपले १००% प्रयत्न देणारे विद्यार्थी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नानेच हे यश प्राप्त करू शकल्याची दिलखुलास शाबासकीची थाप सर्वांनी दिली.
आजच्या या उत्तुंग यशाचे मानकरी असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा पुष्पगुछ व पेढे देऊन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ रेखा बांदल आणि शाळेच्या प्राचार्या यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या भावी उच्च शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
See also  पेरिविंकलची कौतुकास्पद वाटचाल विद्यापीठ होण्याच्या दिशेने, 10 व 12वी निरोप समारंभात तापकीर यांचे मनोगत