बावधन पोलिस स्टेशनला पिरंगुटसह भूगांव, भुकूम, पिरंगुट ग्रामस्थांचा विरोध, निर्णय मागे न घेतल्यास निवडणूकीवर बहिष्कार

महावार्ता न्यूज ः हरकतीमध्ये विरोध असतानाही बावधन पोलिस स्टेशन सुरू केल्याने मुळशीच्या पूर्व भागात संतापाची लाट उसळली आहे. भूगांव, भुकूम, पिरंगुट, लवळे ग्रामस्थांनी नव्या बावधन पोलिस स्टेशनला विरोध दर्शविला असून हा निर्णय मागे न घेतल्यास विधानसभा निवडणूकीची बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेण्याचा निश्चय केला आहे.
तीन वर्षापूर्वीच बावधन सूससह भूगांव, भुकूम, पिरंगुट, लवळे, नांदे व चांदेसह नवे बावधन पोलिस स्टेधन निर्मितीची प्रकिया सुरू झाली होती. तेव्हा भूगांव, भुकूम, पिरंगुट, लवळे ग्रामातील सरपंचांसह पदाधिकार्‍यांनी लेखी हरकत घेऊन आपला विरोश व्यक्त केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या आदेशानुसार काही काळ बावधन पोलिस स्टेशनचे प्रक्रिया थांबली होती. आता ग्रामस्थ, पौड पोलिस स्टेशनचा यांना अंधारात ठेवून बावधन पोलिस स्टेशन सुरूही करण्यात आले आहे. भूगांव, भुकूम, पिरंगुट, लवळे, नांदे व चांदे तांत्रिकदृष्टया हस्तांस्तर न होताच केवळ सूस व बावधन हद्दीची हे पोलिस स्टेशन बावधनमध्ये सुरू झाले आहे.
1 वरिष्ठ पोलिस निरिक्षक, 2 सहाय्यक पोलिस निरिक्षक, 8 पोलिस उपनिरिक्षक यांच्यासह 60 जणांचा कर्मचारी वर्ग असलेले पोलिस स्टेशन जुन्या बावधन पोलिस चौकीत रूपांतरित करण्यात आले आहे. गावे हस्तांस्तरित न झाल्याने केवळ 2 गावांसाठी सुरू असलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच पोलिस स्टेशन ठरले आहे.
नवीन पोलिस स्टेशन हे पुणे ग्रामिण हद्दीत हवी ही मागणी मुळशीतील पूर्व भागात सुरूवातीपासून होती. स्थानिकांना विश्वासात न घेता पोलिस स्टेशन सुरू झाल्याने भूगाव, भुकूमसह पिरंगुटमधील अनेकांना निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे.

See also  मुळशीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी,  115 वाहनांचे तपासणी, एक लाखांची रोकड जप्त