महावार्ता न्यूज: माजी आमदार संग्राम थोपटेंच्या प्रवेशानंतर आता मुळशीतील राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे 4 दिग्गज नेते व 15 गावचे सरपंच बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहे. यात मुळशीतील माजी सभापती, संचालक व विद्यमान सरपंचांचा समावेश आहे.
मुंबईत भाजपा मुख्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुळशीतील नेते जंगी प्रदेश केला जाणार आहे.
माजी सभापती, पीएमआरडीएचे सदस्य, हिंजवडी, माणमधील सरपंच, उपसरपंच असे 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते भाजपाचा झेंडा हाती घेणार आहे. काॅग्रेसनंतर राष्ट्रवादीत मोठी गळती झाल्याने आता मुळशीत भाजपाची ताकद वाढली आहे.