मुळशीतील बेकायदेशीर दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई, कोळवणमध्ये अवैध दारूभट्टी उध्वस्त, भुकूममध्ये अडीच लाखांचा दारूसाठा जप्त

महावार्ता न्यूज: मुळशीत पौड पोलीसांची बेकायदेशीर दारूविक्रीवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कोळवण रोडवरील  कोळवणमध्ये अवैध दारूभट्टी उध्वस्त केल्यानंतर भुकूममध्ये अडीच लाखांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
पौड पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवण-भालगुडी रोडवरील अवैध दारूभट्टी उध्वस्त करून ती चालविणाऱ्यां विरूध्द दारूबंदी कायदा व IPC कलम 328 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे 2 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करीत एकूण 33000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला होता. त्यामध्ये 1200 लिटरचे कच्चे रसायन व 25 लिटर तयार हातभट्टीची दारू आणि इतर साधने असा मुद्देमाल उध्वस्त करण्यात आला आहे. आरोपी 1) गणेश तुकाराम वाघमारे, रा.कातकरी वस्ती, कोळवण, 2) सखाराम रामा वाघमारे, रा.कातकरी वस्ती, कोळवण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई नुसार आरोपी प्रमोद पांडुरंग नायक वय 33 वर्षे यांच्या हाॅटेल ड्रंकन लेक, भुकुम ता.मुळशी,जि.पुणे येथून 2,50,145/- बेकायदेशीर किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीने बेकायदेशीर, बिगर परवाना दारू जवळ बाळगुन, विक्री करीत होता . फिर्यादी वरून गुन्हा दाखल करुन पोलीस निरिक्षक मनोज यादव यांच्या आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि चव्हाण, नितीन वसंत गार्डी करीत आहे.

See also  ग्रंथतुलाने माजी खासदार अशोक मोहोळांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा, अमृत महोत्सवनिमित्त मीरा मोहोळांचा गौरव , शीला मोहोळांचा विशेष सत्कार