भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद, सोमवारी 19 फेब्रुवारीला भंडारा

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील भूकूम गावाजवळील हरिराम आश्रय मठात माघ शुद्ध दशमीनिमित्त  किर्तन महोत्सवाला यंदाही मोठा प्रतिसाद लाभला असून सोमवारी 19 फेब्रुवारीला भंडारा सोहळा रंगणार आहे. 
संत गणोरेबाबांनी सुरू केलेल्या अखंड हरिराम सप्ताहाचे यंदा 56 वे वर्ष असून 1968 पासून हा उत्सव मोठ्या  उत्साहात साजरा केला जातो. 12 फेब्रुवारीपासून अखंड हरिराम सप्ताह सुरू झाला असून महोत्सवासाठी महाराष्ट्रातून भाविक भुकूममध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. 19 फेब्रुवारीला माघ शुद्ध दशमीच्या सोहळ्यानिमित्त भंडारा होणार आहे. पहाटे संत गणोरेबाबा व संत सीतामाईंंच्या समाधी अभिषेक होईल. सकाळी 9 वाजता संत गणोरेबाबांचर पादुका मिरवणूक निघेल. प्रवचन व किर्तनानंतर दुपारी 1 वाजता अन्नप्रसादाचा भंडारा सुरू होईल. अशी माहिती मठाचे अध्यक्ष जयंती पटेल यांनी दिली आहे. 

संत तुकाराम गाथेचे व गणोरेबाबांच्या ॐ हा गुरू ग्रंथाचे पारायण, हरिपाठ असे सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी श्री बाबांच्या अभंगाचे भजन, प्रवचन आणि रात्री कीर्तन अशी दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. महोत्सवात दररोज संध्याकाळच्या प्रवचनानंतर संध्याकाळी सातनंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांची सुश्राव्य वाणी ऐकता येणार आहे. हभप संतोष सुर्वे, दशरथ वहाळे, महादेव राऊत, राहुल चोरमले, पुरूषोत्तम मोरे, महंत उध्दव मंडलीक, माधव रसाळ, नरेंद्र गुरवे तसेच काल्याचे कीर्तन हभप गणेश कार्ले हे करणार आहेत. 

1956 मध्ये संतशिरोमणी तुकाराममहाराजांनी माघ शुद्ध दशमीच्या दिनी श्री गणोरेबाबांना स्वप्नात मंत्र दिला. हा मंत्र श्री बाबांनी 12 वर्षे जपला. या नामसाधनेच्या तपातूनच संत गणोरेबाबांचा जन्म झाला. माघ शुद्ध दशमीला संत तुकारामांनी उपदेश केल्याने या पुण्यदिनी श्री गणोरेबाबांनी हरिराम आश्रय मठावर 1968 पासून माघ शुध्द दशमीचा महोत्सवानिमित्त अखंड हरिराम सप्ताह भुकूम मठात सुरू केला. सुरुवातीला बाबांच्या काळात दशमीचा उत्सव एका दिवसाचा होता. कालांतराने सात दिवसाचा उत्सव सुरू करण्यात आला. याच उत्सवात अन्नप्रसादाचा भंडार्‍याचा कार्यक्रमाची प्रथा गणोरेबाबांनी रूढ करून ठेवली आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने गणोरेबाबांचे भक्त दरवर्षी या वार्षिक भंडारास येत असतात अशी माहिती हरिराम आश्रय मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे यांनी दिली आहे. 

See also  सवाई गंधर्वची मैफल संपली तरी पंडित संजय गरूड यांच्या सूरांचा गंध दरवळतोयच…,