आवाज कोणाचा आस्मि विचारमंचाचा….नवे अध्यक्ष अ‍ॅड. खामकरांचे अ‍ॅड. रवि शिंदेेंकडून कौतुक

महावार्ता न्यूज ः पुण्यात प्रतिष्ठेची ठरलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत आस्मी विचारमंचाचे अ‍ॅड. संतोष खामकर यांनी बाजी मारताच हरहुन्नरी, सेवाभावी वकिल रवि शिंदे यांनी नव्या अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे.


माझ्या विजयात आस्मि विचारमंच मित्र परिवारावा सिंहाचा वाटा असल्याचे नवे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष खामकर आपल्या विजयानंतर सांगितले. विजयानंतर आस्मि टॉवरमध्ये येताच अ‍ॅड. संतोष खामकरांसह विजयी पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाल, श्रीफळ व पुणेरी पगडी परिधान करून अ‍ॅड. खामकरांचा सत्कार करण्यात आला. आवाज कोणाचा …आस्मि टॉवरच्या जयघोषाने पसिसर दुमदुमला. याप्रसंगी आस्मि विचारमंच मित्र परिवारातील चाहते अ‍ॅड रवि शिंदे यांनी खामकर यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

See also  मुळशी औघोगिक वसाहत एमआयडीसीत वर्ग करावी, खासदार सुळेंकडे मुळशी औद्योगिक संघटनेची मागणी