महावार्ता न्यूज: 203 भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचा निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे की महायुतीचे शंकर मांडेकर बाजी मारणार याचा फैसला काही तासांवरच येऊन ठेपला आहे.
मत मोजणीच्या एकुण २४ फेऱ्यात भोरच्या नव्या आमदाराचा फैसला होणार आहे. पहिले ९ फेऱ्या मुळशी तालुक्याच्या असतील. मुळशीतील धरण भागापासून मतमोजणीस सुरूवात होईल. १ ते ९ मुळशी तालुक्याच्या फेऱ्या असतील.
१० व्या फेरी पासुन वेल्हा तालुकातील मतमोजणी सुरू होईल. ११ व्या फेरी पासुन वेल्हा भोर (हायवे) पट्टा मिक्स मतमोजणी होईल. १५ व्या फेरी पासुन भोरमधील भोंगवली संगमनेर गट सुरु होत आहे.
२१ व्या फेरी पासुन भोर शहर सुरु तर २२ व्या फेरी पासुन वीसगाव खोरे भागातील मतमोजणीची प्रक्रिया असेल.
सकाळी 7 वाजता टपालाची मतमोजणी सर्वप्रथम होईल. त्यानंतर मशिनवरील मोजणी सुरू होईल. सकाळी 9 पर्यत कल समजून येतील. ११ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
गावानुसार फेऱ्या पुढीलप्रमाणे