मुळशीतील मोठ्या गावात  संग्राम थोपटेंचा झंझावात, रिहे खोरे, घोटवडेसह माण-मारूंजी-हिंजवडीत अभूतपूर्व प्रतिसाद 

महावार्ता न्यूज: भोर -राजगड- मुळशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशीतील मोठ्य गावात झंझावाती प्रचार दौरा केला. चौरंगी लढत असताना पुन्हा हाच आमदार निवडून येईल असे वातावरण दिसून आले. लाडकी बहिणीची साथ प्रचार दौऱ्यात काॅग्रेसला असल्याचे चित्रही प्रकटले. 

मुळशी तालुक्यातील आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव, रिहे, घोटावडे, मुलखेड, चांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई, नेरे, जांबे, ताथवडे, म्हाळुंगे, सुस,  या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी बोलताना विद्यमान आमदार संग्राम थोपटे म्हणाले ज्या लोकांना काही करता आलं नाही, ज्याच्याकडे विकास कामांचे काही व्हिजन नाही ते लोक मत मिळविण्यासाठी टीकाच करू शकतात आपण सर्वसामान्य जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे व केलेल्या विकास कामांच्या जोरावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जात आहे त्यामुळे सर्व सामान्य जनता, महाविकास आघाडी, मित्र पक्ष आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी माझ्या पाठीमागे खंबीर आहेत.
या भागातील घोटावडे रिहे आंधळे रस्ता, घोटावडे, आंधळे, जवळ येथे मंडळ अधिकारी कार्यालय, पिरंगुट घोटावडे माण हिंजवडी मारुंजी कासारसाई रस्ता, पाषाण सुस नांदे लवळे रस्ता, माण, मारुंजी येथे तलाठी कार्यालय, म्हाळुंगे नांदे चांदे मुलखेड घोटावडे चाले रस्ता, सुस येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय बावधन येथे तलाठी कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय इ.कोट्यावधी निधीतून विकास कामे मार्गी लावली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत आता मतदार संघातील सर्व जनतेचा कल विरोधकांना आता समजला असावा त्यामुळे या प्रक्रियेत मतदार संघात विरोधकांनी काही विकास कामे केली नसून माझ्यावर टीका करून मते मिळवण्यांची वेळ त्यांच्यावर आली आहे. अनेक वेळा विकास कामात खोडा घालण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे झालेल्या लोकसभेच्या निकालातून जनतेने त्यांना दाखवून दिले आणि या विधानसभा निवडणुकीत सर्व सामान्य जनता त्यांना उत्तर मतदानातून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
घोटावडे गावात आमदार थोपटे यांचे जय्यत स्वागत करण्यात आले.यावेळी
स्वाभिमानी मावळा असणारे संग्रामदादि
पुन्हा विधानसभेत दिसणारच असा विश्वास शिवसेना उबाठा गटाचे नतेत प्रकाश भेगडे यांनी सांगितले.
घोटावडे येथील प्रचारात महादेव कोंढरे, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, अविनाश बलकवडे, दादाराम मांडेकर, शिवाजी बुचडे, अॅड. शिवाजी जांभुळकर,  बाळासाहेब केदारी, भानुदास पानसरे, सचिन हागवणे, राम गायकवाड, तुषार माझीरे, प्रकाश भेगडे, सुरेश पारखी, प्रसाद खानेकर, सविताताई दगडे, स्वातीताई ढमाले, सविताताई गव्हारे, निकिताताई सणस, सुरेखाताई तोंडे, रेखाताई शिंदे, निकिताताई रानवडे, मीनाताई मांडेकर, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार, मधुर दाभाडे,
नामदेव टेमघरे, लक्ष्मण ठोंबरे, कैलास मारणे, संतोष पारखी, गणेश केसवड, बाळासाहेब गोंडाबे राजेंद्र शिंदे, भिमाजी केसवड, काळूशेठ गोडांबे, हरिभाऊ धुमाळ, उत्तम गोंडाबे छबन मातेरे, सागर भेगडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
See also  पेरिविंकलच्या  विद्यार्थ्यांनी घेतले योग साधनेचे धडे, सर्वच शाळा झाल्या योगमय, अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनीही केली योगासने