लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्‍काराने निकिता मोघे गौरवित

     पुणे ः  पुणे नवरात्रौ महोत्सवानिमित्त प्रतिष्ठेच्‍या लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्‍काराने निकिता मोघे यांचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रासाठी उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल निकिता मोघे यांना सन्‍मानित करण्यात आले आहे.
३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे क्रीडा क्षेत्रासाठी डॉ. संजय दुधाणे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. ऋतुपर्ण शिंदे, सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. विजय फळणीकर, सांस्कृतिक क्षेत्रासाठी निकिता मोघे आणि लोककलेसाठी वैशाली समसापूरकर यांना उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्‍या हस्‍ते गौरवित करण्यात आले.
 शाल, मानपत्र, स्‍मृतीचिन्‍ह, लक्ष्मीमातेची प्रतिमा असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. याप्रसंगी  ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी, उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल, युवासेना पुणे शहराध्यक्ष हेमंत बागुल, सिनेतारका भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया,ऋजुता जुन्नरकर यांची उपस्थिती होती.
.उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी अरुंधती पटवर्धन समूहाने ‘शिवशक्ती’ हा भरतनाट्यम कलाविष्कार सादर केला. विनोद धोकटे, स्वाती धोकटे आणि सहकलाकारांनी ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ तसेच एकवीरा देवीवरील गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया आणि ऋजुता जुन्नरकर यांच्या नृत्याविष्काराने रसिकांची दाद मिळवली. निकिता मोघे यांनी नृत्यदिग्दर्शन केले. या वेळी देवीची आरती करण्यात आली आणि नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
पुढील वर्षापासून पुणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा असे सूचना नामदार उदय सावंत यांनी केली. प्रास्ताविकात आबा बागुल यांनी सांगितले की, या महोत्‍सवातील पुरस्‍कराचे मानकऱ्यांना पुढे राष्ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त होतात असा आमचा अनुभव आहे. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले, तर घनश्याम सावंत यांनी आभार मानले.
See also  कोल्हापूरच्या विकासासाठी रेल्वे हद्दवाढ गरजेची; सर्वेक्षण अहवाल मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती