


भूगाव: “गावकी-भावकीच्या राजकारणापलीकडे सुसंस्कृत चेहरा आणि तालुक्याच्या विकासाचे व्हिजन असलेला अनिल पवार यांनी भूगाव पंचायत समिती गणात प्रचारात मुसंडी मारली आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांचा कौल अनिल पवारांच्या बाजूने झुकला आहे.
निवडणुका आल्यावर सगळेच आमच्याशी संपर्क साधतात. काही जण तर आमीषही दाखवतात; पण आमच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्हाला कार्यक्षम आणि सुसंस्कृत नेताच हवा आहे. आमच्या मुलांना योग्य शिक्षण आणि वाचनाचे महत्त्व आज अनिलबापुमुळे समजतंय. त्यांनी आयोजित केलेल्या करिअर गायडंस शिबिरामुळे आज आमच्या मुलांना योग्य दिशा मिळाली. आम्हाला वाचणारा आणि वाचायची प्रेरणा देणारा असा सुसंस्कृत उमेदवारच हवा आहे”, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया भुगाव-भुकूम आणि गणातील अनेक गावांत-वाड्या-वस्त्यांत ऐकायला मिळत आहेत.













