कात्रजच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे यांची बिनविरोध निवड

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन मा. अॅड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी दि. १२ जून रोजी निवडणूक घेण्यात आली.
अध्यासी अधिकारी मा.श्री. प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या संचालक मंडळाची विशेष सभा कात्रज येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाली. चेअरमन पदासाठी संचालक अरुण सिताराम चांभारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने जगताप (निवडणुक अधिकारी) यांनी अरुण सिताराम चांभारे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित चेअरमन अरुण सिताराम चांभारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, संघाचे सर्व संचालक, संघातील कामगार व कर्मचारी वर्गाच्या वतीने कात्रज मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, महिला अध्यक्षा कांचनताई ढमाले व मा. सभापती सुरेश शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन अरुण सिताराम चांभारे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मला चेअरमन पद देण्याबाबत शब्द दिला होता. तो शब्द महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी पाळला. मा. ना. दत्तामामा भरणे, कृषी मंत्री, मा. आमदार दिलीपराव वळसेपाटील, मा. आमदार दिलीप मोहितेपाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार सुनिल शेळके, आमदार शंकरभाऊ मांडेकर, आमदार रमेशआप्पा थोरात, आमदार सुनिल टिंगरे, आमदार अतुल बेनके, आमदार अशोकबापु पवार तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून कात्रज दूध संघाच्या चेअरमनपदी माझी निवड केली आहे. या सर्वांच्या विश्वासाला मी सार्थ ठरवीन.
संघाच्या भावी वाटचालीबाबत ते पुढे म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन संघाची उन्नती व प्रगती केली जाईल. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधणे, हेच माझे प्रथम प्राधान्य असेल.
सदर सभेस संघाचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
See also  पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्यावतीने  शिवजयंती साजरी, मोहनराव दुधाणेंकडून शिवभक्तांना शुभेच्छा