कोल्हापुरी फुटबॉल चा फडकला फिफा वर्ल्ड कप मध्ये झेंडा

कोल्हापूरी फुटबॉल चा झेंडा अभिमानाने फडकला फिफा वर्डकप स्पर्धत : उत्साही कोल्हापूर कर स्वयंसेवक राजवर्धन देसाई यांची दखलपात्र कामगिरी
कोल्हापूर – ( राजेद्र मकोटे) लोकराजा राजर्षी शाहूंची मोठी परंपरा , चवीदार तांबडा – पांढरा रस्सा ,कोल्हापुरी पायतान ते कोल्हापुरी फेटा अशा विविध वैशिष्ट्ये आणि फक्त भारतात नव्हे तर जगभरात कोल्हापुरी डंका वाजत असतो यामध्ये कोल्हापुरी पण भिडलेले अनेक जण ही परंपरा कल्पकतेने पुढे नेत असतात याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली आहे
फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणजे फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2026. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये प्रथमच संयुक्तपणे होत असलेल्या या स्पर्धेत जगभरातील लाखो फुटबॉलप्रेमी सहभागी होत आहेत . अशा ऐतिहासिक स्पर्धेत कोल्हापूरचा युवक राजवर्धन देसाई यांची स्वयंसेवक (Volunteer) म्हणून झालेली निवड ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची अशीचबाब आहे.
कोल्हापुरी बाला जपत आपले करिअर घडवण्यासाठी थेट अमेरिकेत स्थिरतावर झालेले राजवर्धन देसाई हे फुटबॉलचे निस्सीम चाहते आहेत . त्यांनी अनेक वर्षे या खेळाशी आपले नाते जपले आहे. तब्बल सव्वा लाख प्रवेशिका मधून एक हजार फिफाच्या स्वयंसेवक निवड प्रक्रियेत त्यांनी यश मिळवत जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव पोहोचवले आहे. स्वयंसेवक म्हणून ते स्पर्धेतील विविध व्यवस्थापन, प्रेक्षक मार्गदर्शन, माहिती केंद्र, आयोजन, समन्वय आणि पाहुण्यांच्या सेवेसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत .
याच बरोबरीने कोल्हापूरकरांच्या रगरगणे फुटबॉल या संस्कृतीचा परिचय ही तेथील स्थानिकांना देत आहेत कोल्हापुरातील मंगळवार पेठ शिवाजी पेठ बुधवार पेठ परिसरात लागलेले विविध खेळाडूंचे विविध आंतरराष्ट्रीय वलयांकित फुटबॉलपटूंचे आणि त्यामध्ये हे ऑजिटिना च्या तारांकीत मेस्सी च्या होल्डिंग चे फोटो त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील चाहत्याना दाखवून शेअर केलेल्या व्हिडिओला लाखो व्हिअर्स लाभले. राजवर्धन देसाई यांनी ‘RAJA 15 – KOLHAPURKAR’ असा जर्सी परिधान करून तसेच कोल्हापूरच्या राजमुद्रेचा ध्वज तयार करून तो विश्वचषकाच्या मैदानात सामन्या दरम्यान फडकवला. या ध्वजावर कोल्हापूरची ओळख असलेले न्यू पॅलेस, शिवाजी विद्यापीठ, रंकाळा तलाव, अंबाबाई मंदिर आणि इतर ऐतिहासिक स्थळांची प्रतीके साकारण्यात आली आहेत. याचबरोबर वरिष्ठ गटातील पीटीएम शिवाजी खंडोबा बालगोपाल तटाकडील वेताळ पेठ जुना बुधवार या संघाचे ध्वज ही त्यावर आहेत .जगभरातील फुटबॉलप्रेमींसमोर कोल्हापूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख पोहोचवण्याचा हा त्यांचा प्रयत्न मोठा कल्पक आणि कौतुकास्पद आहे.
राजवर्धन यांचे फुटबॉलवरील प्रेम केवळ प्रेक्षक म्हणून मर्यादित नाही. खेळातील शिस्त, संघभावना आणि जागतिक मैत्रीचा संदेश ते आपल्या कार्यातून देत आहेत. स्वयंसेवक म्हणून त्यांची निवड ही त्यांच्या समर्पणाची आणि मेहनतीची पावती आहे.
जागतिक कलायाकींत आणि सर्वात मोठ्या फिफा विश्वचषकासारख्या भव्य स्पर्धेत स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचीअसून तो ती जबाबदारी ने पार पाडत आहे . विविध देशांतून येणाऱ्या खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, कार्यक्रमांचे नियोजन सुरळीत ठेवणे आणि स्पर्धेचा दर्जा उंचावणे ही जबाबदारी स्वयंसेवकांवर असते. त्यामुळे राजवर्धन देसाई यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून अवघ्या कोल्हापूरच्या नव्हेतर समस्त माय मराठी तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
आज अनेक तरुण जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत आपली छाप पाडत आहेत. त्यात राजवर्धन देसाई यांचे नाव अभिमानाने घेतले जाईल. फुटबॉलच्या विश्वमंचावर कोल्हापूरचा ध्वज आणि शिवरायांच्या परंपरेचा संदेश पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प प्रत्येक कोल्हापूरकरासाठी गौरवाचा क्षण आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान विस्फोटाच्या युगामध्ये अवघे जगच एक ग्लोबल व्हिलेज – वैश्विक खेडे झाले असताना यामध्ये आपले अस्सल मराठी- कोल्हापुरी पण जपत जगातील सर्वात मोठ्या क्रीडा उत्सव- फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत स्वयंसेवक मोलाची जबाबदारी पार पडली आहे जी सर्वांना आदर्शवत अशीच ठरली आहे .

See also  हरिराम आश्रय मठात माघ शुद्ध दशमीनिमित्त भंडारा सोहळा