


कोल्हापूर 22 (राजेंद्र मकोटे )
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यासाठी EMSA (Educational Excellence) यांच्या वतीने ‘EMSA INSPIRE 2026 – Maharashtra State-Level Celebration of Educational Excellence’ या राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती EMSA चे जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
EMSA चे यंदाचे हे पाचवे वर्ष असून राज्यभरातील 38 शिक्षकांना अणि 15 मुख्याध्यापकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार अमल महाडिक, शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या पत्रकार परिषदेस EMSA चे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, स्वागताध्यक्ष सुहेल बाणदार, उपाध्यक्ष श्री. जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहराध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा प्रमुख सचिव नाईक, राधानगरी तालुकाप्रमुख श्री. रणदिवे तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणाऱ्या या राज्यस्तरीय सोहळ्याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.












