राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरच्या पाटील भगिनीचे सुवर्णपदका सहयश

*राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिव्या पाटील व दिशा पाटील ला सुवर्णपदक*

 

कोल्हापूर शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोंबर :- नवी दिल्ली येथे स्कूल गेम फेडरेशन ने (SGFI)आयोजित केलेल्या 19 वर्षाखालील 70 व्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघानी सुवर्णपदक मिळवत नेत्रदिपक कामगिरी केली.

मुलींच्या गटात भारतातील एकूण 31 संघ सहभागी झाले होते. स्विस लीग सांघिक पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राने सर्व सहा सामने जिंकत 12 पैकी 12 गुण मिळवून मोठ्या फरकाने अजिंक्यपद पटकाविले. केरळ ला नऊ गुणासह रौप्यपदक मिळाले तर आठ गुण मिळवणाऱ्या यजमान दिल्लीला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात कोल्हापूरच्या दिव्या पाटील व दिशा पाटील याचा समावेश होता. दिव्या पाटील महाराष्ट्र मुलींच्या संघाची कर्णधार होती.. कर्णधारला साजेसा खेळ करत दिव्याने सहा पैकी साडेपाच गुण मिळवून वैयक्तिक (बोर्ड प्राईस) सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राचा मुलींचा संघात दिव्या पाटील (कर्णधार) कोल्हापूर, दिशा पाटील कोल्हापूर,अनुष्का कुतवल पुणे, श्रेया हिप्परगी सांगली व सानी देशपांडे औरंगाबाद यांचा समावेश होता.

दिव्या पाटील व दिशा पाटील या जयसिंगपूरच्या जुळ्या बहिणीनी महाराष्ट्राला सलग चौथ्यांदा पदक मिळवून देत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

दिव्या व दिशा या दोघी जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडियम ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी सायन्स मध्ये शिकत आहेत. या दोघींना रोहित पोळ, उत्कर्ष लोमटे व समुख गायकवाड यांचे आजपर्यंत प्रशिक्षण मिळाले आहे. त्याचबरोबर कॉलेजच्या प्राचार्य सौ. स्मिता पाटील मॅडम क्रीडा शिक्षक राहुल सरडे सर, दिव्या व दिशाचे आई-वडील कविता व शरद पाटील, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनीष मारूलकर यांचे प्रोत्साहन लाभले.

See also  केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगी व्यवस्थापनास रंगकर्मींचा ठाम विरोध
पूर्वीचा लेखऊस दराबाबत समन्वय तोडगा काढू – पालकमंत्री आबिटकर
राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे - ( एम ए - मराठी / राज्य शास्त्र / जैन - पाली भाषा ) एम जे सी ( पत्रकारिता - संवाद शास्त्र ) गेली 28 वर्ष कार्यरत - दै सकाळ विद्यार्थी वार्ताहार पासून सामना - ब्युरो चिफ - दै . पुढारी - वाणिज्य आरोग्य पत्रकार - - उद्योग - आरोग्य - विकास पत्रकारिता विशेष लेखन - - सीपीआर - सिध्दगिरी हॉस्पीटल मध्ये 8 वर्ष जनसंपर्क - आरोग्य शिबीर संयोजन - गेली २० वर्षात ४०० हून अधिक आरोग्य - रक्त दा न - नेत्रदान - देहदान संकल्प शिबीराचे आयोजन - जिल्हा रक्त दाते समन्वय समिती सदस्य स्वत : ९० हून अधिक वेळा रक्तदान ( o - ve )