


ज्येष्ठ रंगकरणी शरद भुताडिया इतिहास संशोधक वसंतराव मोरेंचा मिल मान्यवरांच्या ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने सन्मान कोल्हापूर -ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक , रंगकर्मी डॉ.शरद भूथाडिया यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हॉटेल सयाजीच्या मल्हार सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तीस मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे.
प्रमुख पाहुणे पानिपतकार विश्वास पाटील यांनी कोल्हापूरच्या मातीमध्ये वेगळी ऊर्जा असल्याचे नमूद केले. कोल्हापूर शहराशी आपले अनोखे नाते त्यांनी अनेक संदर्भ देऊन उपस्थित त्यांना खिळवून ठेवले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक केल्याचे सांगत कोल्हापूरच्या भविष्यासाठी या सर्वांची योगदान मोलाची ठरेल अशा शब्दात त्यांच्या गौरव केला . कला क्रीडा संस्कृती शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .









