मिलिंद वाळंज यांना पौड-अंबडवेटमधून महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

घघपौड -अंबडवेट जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी सुसाट, प्रचारात मुसंडी
पुणे ः पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मिलिंद नंदकुमार वाळंज व पंचायत समिती अंबडवेट गणाचे अधिकृत उमेदवार प्रविण धनवे यांच्या प्रचार दौऱ्याना मतदारसंघातून अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला. या गटात राष्ट्रवादीने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून आले आहे.

पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील चौरंगी निवडणूकीत मिलिद वाळंज यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मतदार संघातील शेतकरी, तरूणांनी मिलिंददादांना पाठिंबा दिल्यानंतर मंगळवारच्या प्रचार दौऱ्यात वाळंज यांना महिलांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. मारणेवाडी, आंबेगाव, भरे व दारवली नंतर आज आसदे खोऱ्यात मिलिंद नंदकुमार वाळंज यांचे मतदारांनी जंगी स्वागत केले.
वाळंज यांनी पदयात्रा व कौटुंबिक भेटींच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. वाळंज यांनी भरीव कामगिरीच्या जोरावर निवडणुकीत स्पष्ट आघाडी घेतली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा हिशेब देत वाळंज यांनी मतदारांची मने जिंकली असल्याचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

वाळंज यांचा विजय होणारच अशी चर्चा गावागावात रंगू लागली असून संपूर्ण वाळंत कुंटुंब प्रचारात सक्रीय झाले आहे. जनसेवेचा तीन पिढ्यांचा वारसा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची ठोस दृष्टी हेच वाळंज कुटुंबाचे विजयाचे गणित असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. वाळंज यांच्या मातोश्री वत्सलाताई वाळंज यांनी सरपंच म्हणून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून आदर्श कारभाराचा आदर्श घालून दिला. हाच वारसा आज मिलिंद वाळंज प्रभावीपणे पुढे नेत आहेत. त्यांनी वर्षभरात महिलांसाठी देवदर्शन यात्रा, महाआरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, विमा योजना, विद्याथ्यांना आर्थिक मदत, मंदिर व सभामंडप दुरुस्ती, पाणीप्रश्नावर योजना राबविल्याने संपूर्ण मतदार संघात एकच वादा मिलिंद दादा हा नारा गर्जत आहे.
See also  मुळशीत आज कोण ठरणार भाग्यवान ? जिल्हा परिषदसह पंचायती समितीचे आज आरक्षण सोडती