सुधीर मोरे साहेब……….क्रीडा प्रशासनातील दिपस्‍तंभ

सुधीर मोरे साहेब 

क्रीडा प्रशासनातील दिपस्‍तंभ

प्रा. संजय दुधाणे,पुणे

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे अभ्यासू क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे साहेब सोमवार 31 ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोरे सरांचा निवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांच्या हा धावता जीवनप्रवास…

महाराष्ट्राच्‍या क्रीडाक्षेत्रात ऑलिम्‍पिक, आशियाई, राष्ट्रकुल पदकाचे तोरण बांधण्यासाठी ज्‍यांनी मोलाचे योगदान दिले त्‍यातील आघाडीचे प्रशासकीय क्रीडा पदाधिकारी म्‍हणजे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर भाऊराव मोरे.
स्‍व. खाशाबा जाधव, स्‍वप्‍नील कुसाळे, सचिन खिलारी आणि भिमराव केसरकर या ऑलिम्‍पिक पदक विजेत्‍यांपासून ते अनेक राष्ट्रकुल, आशियाई तसेच राष्ट्रीय स्‍पर्धा, खेलो इंडिया स्‍पर्धेतील विजेत्‍यांसाठी कार्यतत्‍पर अधिकारी सुधीर मोरे सर आज निवृत्त होत आहे. कायदोपत्री मोरे सर निवृत्त होत असले तरीक्रीडा विभाग, क्रीडा संघटना, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक यांच्‍या मनातून मोरे साहेब यांचे अढळ स्‍थान कायम असेल. ध्रुवतारा सारखे ते दिपस्‍तंभ असणार आहे.


५ भाऊ व २ बहिणीनंतर सुधीर ही धाकटीपाती मोरे कुटुंबियात अवतरली होती. मोरे सरांचे वडिल डॉ भाऊराव झिंगुजी मोरे हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. क्रीडा प्रशिक्षणाची पंढरी असणाऱ्या अमरावतीत जन्‍म झालेल्‍या मोरे सरांचे बालपण खडतर परिस्‍थीतीत गेले. सुरूवातीला गोठ्यामध्ये तर कधी भाड्याच्‍या एका खोलीत त्‍यांचे प्राथमिक शिक्षण झाले. धार्मिक आईवडिलांच्‍या संस्‍कारात मोरे सरांची जडणघडण झाली. मोरे सरांचा परिवार तसेच रक्‍ताच्‍या पलीकडच्‍या नात्‍यांनेही त्‍यांच्‍या प्रारंभीच्‍या काळात मदतीचा हात दिला. त्‍यांचे मामा लक्ष्मण बायस्‍कर यांनी मोरे सरांना हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळाचा वाट दर्शविला. तोच त्‍यांच्‍या जीवनाचा टर्निग पाईंट ठरला.

१९७८ ते १९९३ कालावधीतत इयत्ता पाचवी ते बी. ए. सी , एम पी एडपर्यंत मोरे सरांची हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळाच्‍या शैक्षणिक संकुलात शिक्षण पूर्ण झाले. हे जवळजवळ १५ वर्ष सर घरापासून दूर असलेल्‍या वसतीगृहात होते. पितृतुल्‍य त्रिमूर्ती वसंत हरणे, सुरेश देशपांडे, प्रभाकर पंत वैघ या रथी महारथीच्‍या मार्गदर्शनाव्‍दारे मोरे सर क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी ९० च्‍या दशकात सज्‍ज झाले होते. गुरूवर्य अशोककुमार वालियामुळे मोरे सर राष्ट्रीय खेळाडू घडले. जिम्‍नॉस्‍टिक्‍समध्येच
एनआयएस डिप्‍लोमा पूर्ण करीत त्‍यांनी शासकीय सेवेत जाण्याचा अचूक निर्णय घेतला.

एमपीएडच्‍या शैक्षणिक वर्षात प्रबंध लिहित असताना Effortts Nevet Falis प्रयत्‍न कधीही वाया जात नाही हे पेपरवेटवरील वाक्‍य मोरे सरांच्‍या जीवनाचे जणू बोधवाक्‍य बनले. १९९५ मध्ये नांदेड जिल्‍हा क्रीडा अधिकारी पदापासून सरांच्‍या शासकीय सेवेचा श्रीगणेशा झाला. त्‍यानंतर त्‍यांनी मागे वळून पाहिलेच नाही. काळाच्‍या प्रवाहासोबत महाराष्ट्राच्‍या क्रीडाक्षेत्रातील प्रगतीसाठी त्‍यांच्‍या पाऊलखुणा उमटत गेल्‍या. नांदेड, नागपूर, यवतमाळ, अकोला, धुळे, बुलढाणा, नाशिक येथे आदर्श जिल्‍हा क्रीडा अधिकारी म्‍हणन त्‍यांनी नावलौकिक प्राप्‍त केला.

नाशिकमध्ये ते डिएसओ असतानाच तेथील क्रीडा प्रबोधिनीत पॅरीस ऑलिम्‍पिक पदक विजेता स्‍वप्‍नील कुसाळे सह अनेकांनी मोरे सरांनी अत्‍याधुनिक सुविधा, .प्रशिक्षणाचे व्‍दार खुले करून दिले. यामुळेच महाराष्ट्र शासन हे ऑलिम्‍पिक विजेताही घडवीत असल्‍याचे अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्‍हा क्रीडा संकुलासाठी सुधिर मोरे सरांचे योगदान कधीच विसरता येणार नाही असे आजही स्‍थानिकांचे मत आहे. अकोला येथील जिल्‍हा क्रीडा संकुलासाठी न्‍यायालयीन लढा जिंकल्‍यानंतर ते भव्‍य संकुल उभारण्यासाठी ख्यातनाम गझल गायक जगजीतसिंग यांचा भव्‍य कार्यक्रमाचे मोरे सरांनी यशस्‍वी आयोजन केले होते. क्रीडा व कलेचा सुरेख संगम साधून क्रीडा वैभव उभा करणारा असामी विराळाच ठरला आहे. तत्‍कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्‍यांना शाबासकी दिली होती

पुणे मुख्यालयात २०१३ मध्ये मोरे सरांनी सहाय्यक संचालक, उपसंचाक पदी आपल्‍या कार्याचा ठसा उमटविला. ध्यानीमनी नसताना त्‍यांना २०२१ मध्ये लातूर विभागीय उपसंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. ती समर्थपणे पेलल्‍यानंतर ११ ऑगस्‍ट २०२३ पासूत मोरे सरांनी सहसंचालकाचा कार्यभार हाती घेतला. दरमान्‍यच्‍या काळात दोन वेळा प्रभारी आयुक्‍त पदाचा कार्यभारही सरांनी संभाळला होता. नामदार मनोहर जोशी पासून ते श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्‍यापर्यंतचे १८ क्रीडामंत्री आणि तब्बल २१ क्रीडा आयुक्‍त मोरे सरांच्‍या कालावधीत होते. या काळात उल्‍लेखनीय निर्णय घेताना मोरे सरांच्‍या सूचनाचे अनेक मंत्री महोदय आणि आयुक्‍त साहेबांनी कौतुक केले आहे.

थेट नियुक्‍ती धोरण, मिशल लक्ष्यवेध योजना, ११८ पदांची भरती, सुधारीत शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार प्रक्रिया, ६९ तालुका क्रीडा अधिकारी पदांना मंजुरी, सुधारीत क्रीडा धोरण, युवा धोरण सारख्या अनेक योजनांच्‍या कार्यवाही मोरे सरांचे योगदान दिशादर्शक ठरले आहे. रात्री ऊशिरापर्यंत शिवछत्रपती राज्‍य क्रीडा पुरस्‍कार तयारी, आशियाई ॲथलेटिक्‍स स्‍पर्धा, खेलो इंडिया स्‍पर्धेची तयारी करताना मोरे सरांनी कार्य जिव्‍हाळा अनेकांनी अनुभवला आहे.

  • कुटुंबवत्‍सल्‍य असणाऱ्या सुधीर मोरे सरांना बालपणी आईवडिल, नंतर पत्‍नी जया यांनी समर्थ साथ दिली. कर्तत्‍वदक्ष वडील भाऊराव, देवभोळी आई सुशीला, मोठी बहीण उषा ताई, जावई किशोर इंगळे हे आज स्‍वर्गवासी झाले असले तरी त्‍यांची शिकवण आणि आठवण आजही सरांनी नवे बळ देऊ देत आहेत. बहिण संध्याताई इंगळे, चुलत बंधू पांडूरंग व विठ्ठल मोरे, सासरे हेमंत भालेराव यांनीही पडत्‍या काळात सरांना आधार देत पुढे जाण्याचा मार्ग दर्शविला.

  • कोणतीही पदवी न घेता जन्‍मताच चित्रकार असणारा ज्‍येष्ठ भाऊ बंडू मोरे यांचा आधारही सरांना डोंगरासारखा आहे. मुंबईच्‍या मंत्रालयात बंडू मोरे यांचे राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र झळकले आहे. सुधीर व बंडू मोरे या दोन्‍ही सख्या भावांनी आपज्‍या कार्यांचा झेंडा राज्‍यात फडकविला आहे. मोरे सरांचे सुपुत्र सुजय व सुयश आता आपल्‍या क्षेत्रात मोरे घराण्याची यशस्‍वी पताका फडकवित आहे. सुजय हा अमेरिकेत कार्यरत आहे. कुटुंबियातील शेकडो नातलग व त्‍यापेक्षा रक्‍तापलीकडी जपलेली नात्‍यातील तुमच्‍यासारखी हजारो मंडळी हे मोरे सरांचे वैभव आज प्रकट झाले आहे.
See also  पिरंगुटच्या मशिदीत ‘बाहेरील मुस्लिमांना बंदी’; , ग्रामस्थांचा निर्णय
मोरे सरांचा क्रीडा विभागातील प्रदीर्घ सेवाकाळ हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहिला आहे. सहसंचालक पदाची धुरा सांभाळताना मोरे सरांनी महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला एक नवी दिशा दिली. तळागाळातील खेळाडूंना न्याय मिळवून देणे, क्रीडा प्रबोधिनींच्या माध्यमातून नव्या पिढीचे खेळाडू घडवणे आणि क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करणे यात आपले योगदान अद्वितीय आहे. एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि तितकेच सहृदयी अधिकारी म्हणून आपली प्रशासनात ख्याती आहे. शासकीय योजना आणि क्रीडा धोरणे यांची तंतोतंत अंमलबजावणी करून मोरे सरांनी अनेक क्रीडापटूंचे भविष्य उज्ज्वल केले. सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची आपली वृत्ती आणि खेळाडूंच्या अडचणी सोडवण्याची मोरे सरांची तळमळ नेहमीच स्मरणात रहाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने आणि उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याने आपण जी मोलाची कामगिरी बजावली आहे, त्‍याचा आज गौरव करताना आम्‍हाला सार्थ अभिमान वाटत आहे.

पंढरीच्‍या विठ्ठलाचे भक्‍त असणारे सुधीर मोरे सर हे पर्यावरण प्रेमही आहेत. घराच्‍या वास्‍तुशांती समारंभा प्रंसगी त्‍यांनी सर्वांना रोप भेट देऊन आगळीवेगळी स्‍मृती दिली होती. आजही शासकीय सेवेही यशस्‍वी पूर्णता करीत असताना तब्बल ५८१ वृक्ष लागवडीचा त्‍यांचा संकन्‍प नवा दिशादर्शक ठरला आहे. मोरे सरांच्‍या कार्यारूपी कामांच्‍या सावल्‍या उपस्‍थितीच्‍या मनात तर ते निवृत्त होत असताना त्‍यांनी लावलेल्‍या वृक्षाच्‍या सावल्‍या येणाऱ्या पिढीलाही सावल्‍या देतीत आणि सांगत रहातील Effortts Nevet Falis प्रयत्‍न कधीही वाया जात नाही…..