कुस्तीपटू अमृता पुजारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले विशेष कौतुक -जिल्हाधिकारी राठोड यांनी केला गौरव

जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृताची रौप्यभरारी!

कोल्हापूर –जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमृता पुजारीची ऐतिहासिक कामगिरी; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते अमृता व प्रशिक्षक दादासो लवटे यांचा सत्कार

कोल्हापूर : अमेरिकेतील लास वेगास येथे झालेल्या U-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ७२ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावून कोल्हापूरच्या कु. अमृता पुजारी हिने आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीनंतर आज कोल्हापुरात आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते तिचा तसेच तिचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक श्री. दादासो लवटे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, श्री. सुहास पाटील, NIS कुस्ती प्रशिक्षक श्री. चंद्रकांत चव्हाण आणि श्री. वसंत पाटील उपस्थित होते.

जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळविता येते, याचे अमृता पुजारी हे प्रेरणादायी उदाहरण आहे. मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या अमृताने आपल्या मेहनतीच्या जोरावर जागतिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली असून, अमृता पुजारी हिने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशामुळे या परंपरेचा गौरव वाढला आहे. तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

See also  विजयासह भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल, थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात
पूर्वीचा लेखकोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न*
राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे - ( एम ए - मराठी / राज्य शास्त्र / जैन - पाली भाषा ) एम जे सी ( पत्रकारिता - संवाद शास्त्र ) गेली 28 वर्ष कार्यरत - दै सकाळ विद्यार्थी वार्ताहार पासून सामना - ब्युरो चिफ - दै . पुढारी - वाणिज्य आरोग्य पत्रकार - - उद्योग - आरोग्य - विकास पत्रकारिता विशेष लेखन - - सीपीआर - सिध्दगिरी हॉस्पीटल मध्ये 8 वर्ष जनसंपर्क - आरोग्य शिबीर संयोजन - गेली २० वर्षात ४०० हून अधिक आरोग्य - रक्त दा न - नेत्रदान - देहदान संकल्प शिबीराचे आयोजन - जिल्हा रक्त दाते समन्वय समिती सदस्य स्वत : ९० हून अधिक वेळा रक्तदान ( o - ve )