


महावार्ता न्यूज: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेत ख्रिसमस संध्या शेकोटीने साजरी करण्यात आली. शेकोटीची उब विद्यार्थ्यांना देणारी पेरिविंकल स्कूल ही मुळशीतील पहिलीच शाळा ठरली आहे.
ख्रिसमस ईव्ह च्या निमित्ताने वाढत्या थंडीचे व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून विदयार्थी व शिक्षकांसाठी बॉनफायर म्हणजेच शेकोटीचे आयोजन केले होते. परीक्षा संपून नाताळच्या सुट्ट्या लागण्याआधी विदयार्थ्यांनी या वर्षभरात केलेल्या परिश्रमाची व मेहनतीची दाद म्हणून त्यांना शेकोटीच्या बाजूला गेम्स, गाणी, अंताक्षरी असे नानाप्रकारचे खेळ घेऊन या वर्षाला गुड बाय करून नवीन वर्षाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांची पालकांसमवेत शाळेत संध्याकाळी खास शेकोटी रंगली होती.














