ब्रह्माकुमारीजकडून महाशिवरात्री महोत्सव पिरंगुटमध्ये उत्साहात साजरा

महावार्ताब्रह्माकुमारीज् विद्यालयाच्या स्थानिक सेवाकेन्द्र पिरंगुट तसेच हृदय मोहिनी वन धनवेवाडी शाखेतर्फे शिवध्वजारोहण करण्यात आले.  आदरणीय ब्रह्माकुमारी करुणा दीदी, ब्रह्माकुमारी अश्विनी दीदी,  ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, श्री ज्ञानेश्वर बोडके, श्री तानाजी भोजने, डॉक्टर गणेश जाधव यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना ब्र.कु करुणा दीदीं यांनी अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त भारत निर्माणासाठी प्रतिज्ञा करवून घेतली. याप्रसंगी पिरंगुट गावातील पेशवेकालीन गणेश मंदिरात  आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी प्रदर्शनी  भाविकांचे आकर्षण ठरले. शहरातील शिवमंदिरात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले त्यात  स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म परिचय तसेच परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, कर्मांची गहन गती या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्यांचे स्पष्टीकरण करण्यात आले. राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली. नागरीकांना राजयोगाच्या अभ्यास स्थानिक शाखेत विनामुल्य मिळणार असल्याचे आवाहनही आयोजकांनी या प्रसंगी केले.
See also  शंकरभाऊ आमदार झाल्याचे झळकले फ्लेक्स, भोरमधील 74 टक्के विक्रमी मते ठरविणार नवा आमदार