पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्यावतीने  शिवजयंती साजरी, मोहनराव दुधाणेंकडून शिवभक्तांना शुभेच्छा

महावार्ता न्यूज: पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्यावतीने पारंपरिक  शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
लोकाधिकार पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनराव दुधाने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण केला. उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन दुधाणे यांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल ग्रुपच्या कार्याचे कौतुकही केले. 
याप्रसंगी मुख्य पार्सल सुप्रीन्टेंड जे सी कांबळे, उदय तुपे, प्रवीण नायडू,  पुणे लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, महेश बोन्द्रे, अजय भंडारी, सचिन गायकवाड, संतोष थोपटे दत्ता ढवळे, निरंजन व्होटकर व अनेक पार्सल विभागाचे पदाधिकारी उपस्थितीत होते

See also  पिरंगुटमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तीचा जागर, उद्या दुर्गामाता दौड, वाचा श्री तुळजाभवानी देवस्थानचा इतिहास फक्त महावार्तावर