विधानसभेसाठी मुळशीतून 4 इच्छुक, 2 झाले थंड, आता होईल का बंड?

(महावार्ता विशेष ) भोर विधानसभा मतदारसंघात मुळशीचा समावेश होऊन 15 वर्ष ओलांडली तरी आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही. हे परिवर्तन घडविण्यासाठी गत निवडणुकीपर्यंत मूळची राष्ट्रवादी झटत होती. यंदा मुळशीतून तीन पक्षाचे 4 जण घाम गाळत आहे. 4 पैकी 2 इच्छुक सोमवारपासून थंडावले आहेत. नाॅट रिचेबलही झाले आहेत. यामुळे भोर विधानसभेची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सरळ लढत का बंडखोरासह तिरंगी लढतीत 203 भोर-मुळशी-वेल्हात रंगण्याची शक्यता वाढली आहे…

मुळशीतून उमेदवार दिला तर परिवर्तनाची लाट उसळू शकते. यामुळेच काही जण 2 वर्षांपासून, काही जण 6 महिन्यातून मुळशीत अचानक सक्रीय झाले. गेले महिनाभर तिकिटासाठी इच्छुकांनी वरिष्ठांचे उंबरठे झिजवत आहे. मुंबईत मुक्काम ठोकून आहे. निवडणुकीचा बिगुल वाजला तरी तिकिट काही हाती अजून आले नाही. 4 पैकी दोघांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. भावी आमदार असलेले त्यांचे बॅनरचे काय करायचा हा प्रश्न बिचार्‍या कार्यकर्त्यांपुढे पडला आहे…
See also  मुळशीतील पूर्व पट्टयात संग्राम थोपटेंच्या प्रचारात उसळली गर्दी , माण, हिंजवडी, मारूंजीतही महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा