मुळशीतील पैलवानांची काँग्रेसला साथ, थोपटेंच्या प्रचारात भुगाव, भुकूममधील कुस्तीगीर आघाडीवर

महावार्ता न्यूज ः महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांना मुळशीतील पैलवान मंडळींनी साथ दिली आहे. काँग्रेसच्या प्रचारात भुगाव व भुकूमसह तालुक्यातील कुस्तीगीर आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.
हॅटट्रिक आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशीतील प्रचाराच्या पहिल्या फेरीत दोन दिवसांत 38 गावांत झंझावाती दौरा केला. मुठा खोरे, कोळवण खोर्‍यात नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर प्रचाराचा शेवट भुकूमनंतर भुगाव गावात झाला. कुस्तीगीरांचे गांव अशी ख्याती असलेल्या याच गावातील पैलवानांनी महाराष्ट्र केसरीची स्पर्धेचे आयोजन केली होती. ह यशस्वी आयोजन केलेले कुस्तीगीर आता संग्राम थोपटे यांच्या प्रचरासाठी आखाड्यात उतरली आहेत.

भुगाव गाम मंदिारात झालेल्या प्रचार सभेत पै. दगडूकाका करंजावणे, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे मा. अध्यक्ष शिवाजी तांगडे, पै. गोविंद मिरगे, पै. राहुलआबा शेडगे, रमेशनाना सणस, पै. स्वस्तिक चोंधे, पै. जमनादास इंगवले, बाजीराव खाणेकर, भालचंद्र चोंधे, नारायण करंजावणे, निवृत्ती शेडगे, भालचंद भिलारे यांच्यासह भुकूमधील तरूण कुस्तीपटूसह मुळशीतील क्रीडाक्षेत्रील खेळाडू, संघटक व प्रशिक्षकांनी आमदार थोपटे यांना पाठिंबा जाहिर केला आहे. पै. दगडूकाका करंजावणे,शिवाजी तांगडे, राहुलआबा शेडगे, रमेशनाना सणस, पै. स्वस्तिक चोंधे यांनी प्रचरारात सहभाग घेतला आहे.
मुळशीतील भरे येथील क्रीडासंकुला कुस्ती अ‍ॅकॅडमी सुरू होण्यासाठी 3 कोटींचा निधी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी मंजुर केला आहे. कुस्तीगीरांना सतत सहकार्य केल्याबद्दल कुस्तीगीरच नव्हे तर संपूर्ण तालुका आमदार थोपटे यांच्या पाठिशी खंबिरपणे उभा असल्याचे राहूल शेडगे यांनी सांगितले आहे. विधानसभेेच्या कुस्तीत संग्राम थोपटेंच बाजी मारणार असे दगडूकाका करंजावणे यांनी प्रचारसभेत बोलताना निर्धार व्यक्त केला.
See also  मुळशीत हवा कोणाची ? तुतारी की घड्याळ, नोटा की नो वोट – बारामती लोकसभा मतदारसंघ, महावार्ता गाऊंड झिरो रिपोर्ट 1