मुळशीत अजीत पवारांची तोफ  धडधडणार, खासदारांसह आमदारांचाही घेणार समाचार?

महावार्ता न्यूज: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. मुळशीत अजीत पवारांची तोफ  धडधडणार असून खासदारांसह आमदारांचाही  समाचार घेणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. 
रविवारी (दि.१० नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता घोटावडे मुळशी येथील दत्तकृपा मंगल कार्यालयात अजीत पवार यांची सभा होणार आहे. 
शंकर मांडेकर यांनी आज मुळशी तालुक्यातील
यामध्ये भरे, अंबरवेट, सुतारवाडी, कासारआंबोली, बलकवडेवाडी, उरावडे, आंबेगाव, भिलारवाडी, मारणेवाडी, शेलारवाडी, काळभोरवाडी, बोतरवाडी, कांजनेवस्ती, गाडेवाडी, मुकाईवडी, वरपेवडी, खाटपेवाडी, भुकुम, अंग्रेवाडी, भूगाव, बावधन या गावांमध्ये दौरा केला. या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी मांडेकर यांचे ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. अनेक ठिकाणी जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
“मतदार संघातील जनता हेच माझे कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन,” असे वचन भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी गावभेटी दरम्यान दिले. पुढच्या पाच वर्षांत भोर तालुक्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “मतदारसंघाच्या विकासावर माझे विशेष लक्ष असेल आणि तालुक्याच्या उन्नतीसाठी मी सतत कार्यरत राहीन,” अशी ग्वाही शंकर मांडेकर यांनी दिली.
See also  भुकूममध्ये आज सीतामाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, नामस्मरण