


पौड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.मुळशी विभागाच्या वतीने पौड येथे मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले.दादांच्या अस्थिकलशाचे दर्शनाने सारे पीडीसीसीचे सभागृह हळहळले.
शोकसभेला पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश भाऊ मोरे,कात्रज दूध संघांचे संचालक चंद्रकांत भिंगारे,सहकारातील नेते माऊली कांबळे,चंदाताई केदारी,मधुराताई भेलके,सुरेखाताई चौधरी,राजेंद्र मारणे,विभागीय अधिकारी सुरेश नागरे,वसुली अधिकारी अमोल मारणे,सर्व सेवक,विका संस्थांचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक,सचिव व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी बहुसंख्येने लोकांनी आपल्या शब्दांतून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनीलभाऊंमुळे सर्वांना दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याचा संधी मिळाली.
यावेळी दारवली येथील शेतकरी राजेंद्र ओव्हाळ यांनी दादांबाबतचा एक प्रसंग सांगितला.ओव्हाळ म्हणाले,माझावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला.मला ससून रुग्णालयात दाखल केले गेले.पण परिस्थिती चिंताजनक असल्याकारणाने मला कमला नेहरू हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आले.रुग्णालयाकडून रिस्पॉन्स मिळत नव्हता.मी सुनीलभाऊंना फोन केला .त्यांनी ही बाब दादांच्या कानावर घातली.दादांनी लगेच रुग्णालय प्रशासनास फोन करून तात्काळ यंत्रणा कामाला लावली.आणि मला तात्काळ उपचार मिळाला.आणि माझा जीव वाचला.
खारवडे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुराताई भेलके यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी दादांबाबतची एक आठवण सांगितली.भेलके ताई म्हणाल्या की,खारवडे येथे पाण्याचा टाकीचे काम पूर्ण झाले होते.त्या कामाचे उद्घाटन करायचे होते .मी दादांकडे गेले.त्यांना सांगितले पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आपल्या हस्ते करायचे आहे.दादा म्हणाले सरपंच कुठे आहे.आमचा सरपंच धनगरवस्ती वर होता.त्याच्याशी संपर्क साधून दादांना फोन दिला.दादा म्हणाले,सरपंच टाकीच्या उद्घाटन करायचे आहे ,मी आले तर चालेल ना.? अशाप्रकारे गावात अंतर्गत वाद आहे की नाही याची दादांनी शहानिशा केली.असे दादांचे काम होते.
सुनील भाऊंनी त्यांचा शब्दात दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सर्व उपस्थितांनी उभे राहून पसायदान म्हणून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.














