मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, 2 जिल्हा परिषदसह 3 पंचायत समितीवर मारली बाजी

मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, 2 जिल्हा परिषदसह 3 पंचायत समितीवर मारली बाजी
महावार्ता न्यूज:  पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीने अपेक्षित वर्चस्व संपादन केले. भाजपाने प्रथमच मुळशीत खाते उघडले आहे. 
जिल्हा परिषदेवर शांताराम इंगवले व मिलिंद वाळंज यांनी बाजी मारली. हिंजवडीतील जागा भाजपाच्या शिवाजी बुचडे यांनी खेचून आणली. मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 तर भाजपाचा 1 उमेदवार निवडून आला आहे.
हिंजवडी-माण परिसरातील राजकीय चित्र स्पष्ट केले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील थेट संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या हिंजवडी-माण गटात भाजपाचे शिवाजी बुचडे पाटील यांनी विजय मिळवत पक्षाचे वर्चस्व राखले आहे. तर पंचायत समितीच्या हिंजवडी गणात भाजपाच्या ऐश्वर्या वाघमारे, तर माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा बाबाजी शेळके विजयी झाल्या आहेत.
मुळशीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
*मुळशी zp final निकाल*
*पौड अंबडवेट जिल्हा परिषद गट*
मिलींद वाळंज राष्ट्रवादी काँग्रेस
5297 मतांनी विजयी
*हिंजवडी-माण गट*
शिवाजी बुचडे, भाजपा
1966 मतांनी विजयी
*भुगांव पिरंगुट गट*
शांताराम इंगवले राष्ट्रवादी काँग्रेस
1384 मतांनी विजयी
*पौड पंचायत समिती गण*
काजल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस
2145 मतांनी विजयी
*अंबडवेट पंचायत समिती गण*
प्रविण धनवे, राष्ट्रवादी काँग्रेस
1776 मतांनी विजयी
*माण पंचायत समिती गण*
मंदा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस
2310 मतांनी विजयी
*हिंजवडी पंचायत समिती गण*
ऐश्वर्या वाघमारे, भाजपा
1322 मतांनी विजयी
*भूगाव पंचायत समिती गण*
दगडू करंजावणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
438 मतांनी विजयी
*पिरंगुट पंचायत समिती गण*
राहुल पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
363 मतांनी विजयी
फोटो ग्राफिक्स सौजन्य- सोनेरी मुळशी 
See also  पेरिविंकलचे स्नेहसंमेलन जल्लोषात , मुळशीकरांकडून कौतुकाची थाप