हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप 

 

कोल्हापूर ०५ राजेंद्र मकोटे

सामाजिक बांधिलकी जपत हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूर यांच्या वतीने आज आदर्श विद्या मंदिर, नागदेववाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

 

शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अनेक गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

 

या कार्यक्रमास हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरचे सेंट्रल ओनर शुभम तुपे यांच्यासह हॅप्पी मेडिकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर हे आरोग्य सेवेसोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपत शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, हॅप्पी मेडिकर परिवारातील सदस्य, शिक्षकवृंद आणि उपस्थितांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

See also  मुळशीत मतदान झाले ठासून, निकाल लागणार घासून, 60 टक्क्यांपेक्षा अधिक झाले मतदान