महावार्ता दिवाळी अंकाला मोठा प्रतिसाद, महाराष्ट्रासह जपान, ऑस्ट्रेलियामध्येही वाचकवर्ग

पुणे ः महावार्ता न्यूज पोर्टलच्या दिवाळी अंकाला सगल 17 व्या वर्षी मोठा प्रतिसाद लाभला आहे. महावार्ताचे ऑनलाईन तसेव छापील अंकाचेही महाराष्ट्रासह जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये स्वागत करण्यात आले. 

कोव्हिड काळात महावार्ता न्यूजची मुर्हूतमेढ करण्यात आली. त्यापूर्वी सलग 10 वर्ष अष्टपैलू नावाने अंक प्रकाशित केला जात होता. 2019 पासून महावार्ता नावाने दिवाळी अंक जगभरातील वाचकांच्या हाती येत आहे. लेखक, क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे हे महावार्ताचे संपादक असून क्रीडा, कथा , वाचनीय लेखाने यंदाचा दिवाळी अंक सजला आहे. 
महावार्ता न्यूज पोर्टलचा कोल्हापूरात विस्तार करण्यात आला असून स्वतंत्र कार्यालयही सुरू झाले आहे. यंदा कोल्हापूर, कोकण व गोव्यातूनही अंकाला मागणी होती. जपान आणि ऑस्ट्रेलियातून मराठी वाचकांनीही महावार्ताचा पीडिएफ दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. 

भारताचे पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकावर आधारित महावार्ता दिवाळी अंकाचे मुख्यपृष्ठ असून खाशाबांच्या 25 कथा वाचनीय कथा या अंकाचे वैशिष्ट आहे. झुंजार खाशाबांचे अनेक दुर्मिळ छायाचित्रही या अंकात पहाण्यास मिळत आहेत. मुळशी पॅटर्न नव्हे तर मुळशी पर्यटन असा संदेश देणारा मुळशी संचित हा लेखही वाचनीय झाला आहे.  23 कथा व लेखांची मेजवानी असणारा महावार्ता दिवाळी अंकात कोल्हापूरच्या पर्यटनाबाबतही प्रकाश टाकण्यात आला आहे.  अतिथी संपादक राजेंद्र मकोटे यांनी हा लेख लिहिला आहे. 
See also  महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम, अकुताई,भाग्यश्री, प्रतिमा सलग दुसर्‍यांदा पदकवीर