धनवेवाडीमधील ब्रम्हाकुमारी विश्वद्यालयाच्या वतीने  महिलांचा सन्मान, राजयोगीनी करुणा दीदींचा  अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष गौरव

महावार्ता न्यूज: ब्रह्माकुमारीज च्या हृदय मोहिनी वन धनवेवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त आदर्श महिला सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. मुळशीकरांकडून सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या राजयोगीनी करुणा दीदींचा  अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी महिला सक्षमीकरण व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली .लहान मुलांनी प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाबाई , शूरवीर राणी लक्ष्मीबाई , दुर्गा देवी , महात्मा गांधी यांच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच त्या महान व्यक्तींची थोडक्यात माहिती दिली .

महिलांनी रांगोळी स्पर्धे द्वारे महिला सन्मान , देवी रूप महिला , बेटी वाचवा , पर्यावरण वाचवा इत्यादी संदेश दिले .या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून गट विकास अधिकारी सुधीर भागवत कार्यक्रमासाठी,पुणे जिल्हा परिषद गट नेते शांताराम दादा इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारे उपस्थित होते.संदीप भाई यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाचा परिचय करून दिला .

राजयोगिनी अश्विनी दीदी यांनी महिलांचे सक्षमीकरण व महिला नैतिक मूल्य संपन्न बनण्यासाठी मार्गदर्शन केले राजयोगिनी करुणा दीदी यांनी सर्वांना राजयोगाची गहन अनुभूती करून दिली .आकांक्षा दीदी व तेजस्विनी दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले .
या कार्यक्रमात आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज योगिनी यात राजयोगिनी करुणा दिदी यांचा मुळशी तालुक्याच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारिका मांडेकर,अर्चना पाटील,शैक्षणिक क्षेत्रातील सुचित्रा साठे,स्नेहा साठे,स्वाती पवळे, वैद्यकीय -उज्वला जोडगे,सुजाता गायकवाड, अंगणवाडी सेविका भाग्यश्री जोशी,स्नेहा सं.साठे-महिला बचत गट,प्रेमा पाटील-सहाय्यक पोलीस या महिलांचा सन्मान करण्यात आला.

See also  ब्रह्माकुमारीज पिरंगुट सेवाकेंद्रचा १७वा वर्धापन दिन उत्साहात साजरा