कोल्हापूरच्या चौघांची आंतरराष्ट्रीय लेक्रोस स्पर्धेसाठी निवड

पुणे : कोलालमपूर ( मलेशिया ) येथे होणाऱ्या साऊथ -ईस्ट आशिया फ्रेंडली सिरीज लेक्रोस स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघांची निवड झाली आहे.
रा.आरे ता. करवीर येथील विरभद्र तालीम मंडळाचे खेळाडू विनय मोहिते, शंभूराजे मोहिते, ऋषिकेश बामणीकर, यांची पुरुष संघात तसेच सावरवाडी ता. करवीर येथील सृष्टी (गौरी ) कंदले यांची सिनियर महिला भारतीय संघात निवड झाली आहे.

भारतीय संघ दि. 25 ऑगस्ट रोजी कलकत्ता येथून मलेशिया येथे रवाना होणार आहे. तसे पत्र भारतीय लेक्रोस फेडरेशन कडून देण्यात आलेआहे. वरील सर्व स्पर्धेक या पूर्वी उदयपूर (राजस्थान )आग्रा (उत्तरप्रदेश ) हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतुन उत्कृष्ट कामगिरी नोंद केलेली आहे. लेक्रोस हा मूळचा लॅटिन अमेरिकन खेळ असून येणाऱ्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. अल्पवधीत भारतात लोकप्रिय होणारा व महाराष्ट्रत नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण असलेला सांघिक खेळ आहे. वरील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र लेक्रोस असोसिएशनच्या अध्यक्षा सुमेधा ठाकूर, राज्य सचिव डॉ. मोहंमद बाबर, जिल्हा सचिव दत्तात्रय वरुटे,जिल्हा क्रीडा अधीक्षक वसंत पाटील, डॉ प्रशांत पाटील संदीप वरुटे, तानाजी बामणीकर, एकनाथ कुंभार, शशिकांत कुंभार रणजीत मोहिते, कृष्णात वरुटे (वकील ) यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
See also  मुळशीतील रिंगरोड भूसंपादन प्रस्तावांचा पीएमआरडीएकडून आढावा