सीमेवरील जवानांसाठी ‘एक राखी’ उपक्रम; स्वामी विवेकानंद ट्रस्टकडून सलग २७व्या वर्षी आयोजन

कोल्हापूर 21
जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. कारगिल युद्धापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे सलग २७वे वर्ष आहे.

या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट आणि महिला संस्थांकडून राख्यांचे संकलन केले जाते. त्यानंतर मराठा बटालियन (टीए) यांच्या सहकार्याने या राख्या थेट सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पाठविण्यात येतात.

दरवर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एक लाखाहून अधिक राख्या संकलित केल्या जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात राख्या संकलित करण्याचे नियोजन ट्रस्टने केले आहे.

२५ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यक्रम

यंदाचा जाहीर कार्यक्रम मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता महादेव मंदिर ते बटालियन, टेंबलाईवाडी मंदिर गेटसमोर, कोल्हापूर येथे होणार आहे.

विविध संकलन केंद्रांवर सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राख्या जमा कराव्यात, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष किशोर घाटगे, सचिव राजेंद्र मकोटे, तसेच सहसंचालक महेश कामत, कमलाकर किलकिले, डॉ. सायली कचरे, नगरसेविका माधुरी किरण नकाते, अशोक लोहार, सुखदेव गिरी, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, उमेश निरकारी, प्रा. दिग्विजय कुंभार (शहीद महाविद्यालय, तिटवे), तुषार साळगावकर (राधानगरी), गिरीष गवंडी (कागल), सुभाष माने (गारगोटी) यांच्यासह पदाधिकारी कार्यरत आहेत.

राखी संकलन केंद्रे

– शुक्रवार गेट : नागराज पेपर स्टॉल
– शहाजी कॉलेज व टेंबे रोड : कामत झेरॉक्स
– महाद्वार रोड : भिवटे पोहे सेंटर, म्हाडगूत पोहे सेंटर
– जिल्हा परिषद परिसर : हॉटेल चिन चायनीज
– ताराबाई पार्क : मँगो एफएम रेडिओ
– शनिवार पेठ : भगिनी मंच – शिवालय
– ईगल प्राइड, मिरजकर तिकटी : देवयानी नेट कॅफे
– पंचरत्न प्लाझा, गुजरी : मैत्रीण मंच – समर्थ ज्वेलर्स
– राजारामपुरी सातवी गल्ली : कॉटन किंग
– राजारामपुरी पाचवी गल्ली : श्रीराम सलून सेंटर
– रविवार पेठ, लक्ष्मीपुरी : जय महाराष्ट्र रसवंती गृह – कमलाकर किलकिले
– मिरजकर तिकटी, पाण्याच्या हौदाजवळ : आनंद मिल्क कॉर्नर – किरण पवार
– रंकाळावेश स्टँड, श्री लस्सीसमोर : अभिजीत न्यूज पेपर एजन्सी
– बिनखांबी गणेश मंदिर रोड : ए. एस. पाठक ज्वेलर्स, हॉटेल ओशोजवळ
– राधानगरी : तुषार साळगावकर – विजय बकरे पेपर स्टॉल
– राधानगरी मेन रोड : साई फोटो स्टुडिओ – नंदू गुरव
– गारगोटी : पत्रकार सविता सुभाष माने – भुदरगड टाइम्स
– बांबवडे, ता. शाहूवाडी : रत्न श्याम ज्वेलर्स – नामदेव गिरी, बाजारपेठ
– कागल पंचायत समिती परिसर : गिरीष गवंडी – कोल्हापूर लेदर चप्पल निर्मिती केंद्र

See also    ब्रह्माकुमारीजकडून महाशिवरात्री महोत्सव पिरंगुटमध्ये उत्साहात साजरा

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन एक राखी देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.