मुळशी धरणग्रस्तांचा सोमवारी रस्तारोको आंदोलन

पौड: हक्काच्या पाण्यासह प्रलंबित २१ मागण्यांसाठी मुळशी धरणग्रस्तांचे सोमवारी 2 नोव्हेंबरला मुंबई-बेंगळुरू महामार्ग रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
पिण्याचे व शेतीचे २ टीएमसी पाणी, पुनर्वसन, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल शेजारी, मुंबई-बेंगळुरू महामार्ग क्र. ४८ येथे आंदोलन होणार आहे.
मुळशीकर,धरणग्रस्त बांधव, नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू केली असल्याचे भाजपाचे युवा नेते अमित कंधारे यांनी सांगितले आहे.
See also  मुळशीचे नवे तहसीलदार – शासकीय की राजकीय