कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघ निवड स्पर्धा संपन्न, राज्यस्तरिय स्पर्धेसाठी चौघांची निवड

*जी.एच.रायसोनी स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत त सोहम खासबारदार अजिंक्य सारंग पाटील उपविजेता तर राजदीप पाटील तृतीय स्थानी*

  1. कोल्हापूर सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर :- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या जी.एच्. रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
    अंतिम सहाव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदार ने सहापैकी साडेपाच गुण करून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद संपादन केले. सोहमला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. सहावा मानांकित कोल्हापूरचा सारंग पाटील ने पाच गुण व 22 टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळविले. दहावा मानांकित कोल्हापूरचा राजदीप पाटील, अकरावा मानांकित हुपरीचा प्रज्वल मुधाळे व बारावा मानांकित इचलकरंजीचा श्रेणिक देसाई यांचा अनुक्रमे तिसरा,चौथा व पाचवा क्रमांक आला.
    स्पर्धेचा बक्षीस समारंभ डॉक्टर सचिन कुंभार अमेय पिळणकर व महेश खोत यांच्या हस्ते झाला यावेळी भरत चौगुले,मनिष मारुलकर,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे व इंद्रजीत कर्वे उपस्थित होते. या स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी पुरस्कृत केल्या तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील यांनी हॉल उपलब्ध करून दिला.
    *इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे*
    6) श्रेयस गाताडे कोल्हापूर 7) श्रीधर तावडे कोल्हापूर 8) स्वरूप जोशी कागल 9) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 10) राज आगेचा गांधीनगर
    *उत्तेजनार्थ बक्षीसे*
    श्रवण कदम कोल्हापूर, अर्णव पोर्लेकर कोल्हापूर, वीर सूर्यवंशी पाटील कोल्हापूर, प्रणव बाईंग कोल्हापूर, रिशान पिळणकर कोल्हापूर व शान्वी खोत हुपरी
    सर्व बक्षीस विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले.
    30 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान वसई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेला अधिकृत संघ
    1) सोहम खासबारदार कोल्हापूर 2) सारंग पाटील कोल्हापूर 3) राजदीप पाटील कोल्हापूर 4) प्रज्वल मुधाळे हुपरी
See also  महाराष्ट्राच्या वैष्णवी पवारला आशियाई युवा तिरंदाजीत रौप्यपदक