


महावार्ता न्यूज ः झोपताना व सकाळी उठल्यावर मनाला सकारात्मक ऊर्जा दिली तर आनंददायी, शांतीपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र ब्रम्हकुमारीज्चे राजयोगी सूरज भाई यांनी धनकवडीतील कार्यक्रमात दिला. सूरज भाईंच्या सकारात्मक विचार मंथनातून पुणेकर मंत्रमुग्ध झाल्याचा अनुभव उपस्थितींनी घेतला.
ब्रम्हकुमारीज्च्या धनकवडी शाखेने सकारात्मक बदलाची बलशक्ती या विषयावर संस्थेच्या विश्व परिवर्तन भवनच्या सभागृहात माऊंट आबू ब्रम्हकुमारीज्चे राजयोंगी सूरज भाई यांचे आध्यात्मिक व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी राजयोगिनी गीता दीदी, ऊषा दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.















